'राजकीय दबावामुळे मी ३० टॅबलेट्स खाल्ल्या' | पुढारी

'राजकीय दबावामुळे मी ३० टॅबलेट्स खाल्ल्या'

मुंबई; पुढारी ऑनलाईन: राजकीय तणावामुळे नेते लोक, कायकर्ते आत्महत्या केल्याचा घटना अनेकवेळा घडल्या आहेत. अशीच एक घटना मुंबई येथे घडली. एका डॉक्टरने राजकीय दबावामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय दबावामुळे तणावात येऊन मी ३० टॅबलेट्स खाल्ल्या. सध्या मी रुग्णालयात दाखल आहे, असे ट्विट राहुल घुले यांनी केले आहे. 

No description available.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या राजकीय एजंट्सपासून आपल्या जिवाला धोका असल्याचे ट्वीट राहुल घुले यांनी केलं होतं. त्यांच्या ट्विट वरुन चांगलीच खळबळ उडवून दिली. मी कायमस्वरुपी दिल्लीमध्ये स्थायिक होणार असल्याचंही त्यांनी सांगितले होते. एवढंच काय तर जिवाला धोका असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणीसुद्धा केली होती.

राहुल घुले कोण आहेत ?

राहुल घुले हे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक आहेत. ते रुग्णांकडून फक्त एक रुपया फी घेऊन उपचार करतात. घुले यांनी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर या क्लिनिकची सुरुवात केली होती. सध्याच्या कोरोना काळातही ते अव्याहतपणे काम करत असून त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकूण आठ कोविड सेंटर चालवले. या कोविड सेंटरमध्ये एकूण 2500 पेक्षा जास्त बेड्स उपलब्ध आहेत.

दरम्यान, घुले यांनी काही राजकीय एजंटमुळे माझ्या जिवाला धोका असल्याचे सांगितले असले तरी हे एजंट नेमके कोण आहेत, याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही.

Back to top button