मुंबई : अखेर मालमत्ता करवाढीला स्थगिती | पुढारी

मुंबई : अखेर मालमत्ता करवाढीला स्थगिती

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मालमत्ता करामध्ये सुमारे १४ टक्के वाढ करण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला होता. पण कोरोना महामारीत अशाप्रकारे करवाढ लादणे योग्य नसल्याचे सांगत, बुधवारी स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मालमत्ता कर वाढीला स्थगिती देत, प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावला.

मुंबईत दर पाच वर्षांनी मालमत्ता करवाढ करण्यात येते. २०१५ मध्ये मालमत्ता कर वाढवण्यात आला होता. त्यानंतर २०२० मध्ये तो वाढवण्यात येणार होता. मात्र, कोरोना महामारीमुळे मालमत्ता करवाढीचा निर्णय लांबणीवर पडला. पण आता पुढील चार वर्षासाठी २०२५ पर्यंत पालिकेने मालमत्ता कर वाढीचा निर्णय घेतला होता. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी बुधवारी सादर करण्यात आला. पण या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेनेसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप जोरदार विरोध केला.

प्रवेश आणि शुल्क समितीने विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा : मंत्री उदय सामंत

मोठा निर्णय! शिवाजी विद्यापीठाच्या तासगाव येथील उपकेंद्राला तत्वत: मंजुरी

नवी मुंबई विमानतळ नामकरण वाद : आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ५ हजार पोलिस तैनात

Back to top button