कोल्हापूर : गौरवाड येथे बालिकेवर कुत्र्याचा पुन्हा हल्ला | पुढारी

कोल्हापूर : गौरवाड येथे बालिकेवर कुत्र्याचा पुन्हा हल्ला

कवठेगुलंद; पुढारी वृत्तसेवा : गौरवाड (ता.शिरोळ) येथे कुत्र्याने चावा घेतल्याची घटना ताजी असताना पुन्हा शुक्रवारी रात्री कुत्र्याने १४ वर्षीय बालिकेवर हल्ला करुन जखमी केले. समृद्धी अतुल कांबळे असे तिचे नाव आहे. सातत्याने लहान मुलांवर होत असलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे गौरवाड परिसर भीतीच्या छायेखाली आहे.

अधिक वाचा : कोल्हापूर : सारथीच्या उपकेंद्राचे उद्‍घाटन; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सरकार मराठ्यांसोबत 

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी बेघर वसाहतीतील पिसाळलेल्या कुत्र्यांनी दोन चिमुकल्या मुलींच्या हातावर आणि पाठीवर चावा घेवून जखमी केले होते. त्यांना उपचारासाठी सांगली येथील सिव्हिल रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

दरम्यान शुक्रवारी रात्री बौद्ध समाज मंदिर जवळ राहणारी समृद्धी ही रस्त्यावर आली होती. त्यावेळी सहदेव कांबळे यांच्या घरासमोर एका कुत्र्याने समृद्धीवर हल्ला करीत चावा घेतला. या घटनेने नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

अधिक वाचा : ‘मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राने अधिवेशन बोलवावे’

 तालुक्यातील दत्तवाड येथे कुत्र्याच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच गौरवाड येथे कुत्र्याचे हल्ले वाढत असून तत्काळ या भटक्या कुत्र्याचा बंदोबंस्त करावा, अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज इंजेक्शन जादा उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणीही ग्रामस्थांकडून हाेत आहे. 

Back to top button