धुळे : उपमहापौरपदी भाजपचे भगवान गवळी | पुढारी

धुळे : उपमहापौरपदी भाजपचे भगवान गवळी

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्याच्या उपमहापौरपदावर भाजपचे नगरसेवक भगवान गवळी यांची निवड झाली. त्‍यांना ५० मते मिळाली. धुळ्याच्या उपमहापौर कल्याणी अपंलकर यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. भाजपच्या वतीने भगवान गवळी तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून खान सादिन हुसेन, एमआयएमकडून शेख मेहरूंनीसा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला हाेता.

अधिक वाचा : जळगाव : जमिनीच्या वादातून एकावर विळ्याने वार

उपमहापाौर निवडीसाठी जिल्हाधिकारी संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज विशेष सभा घेण्यात आली. यावेळी नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते. नियोजित वेळेत कुणीही माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले.  गवळी यांना ५०, खान सादिन यांना १९, व शेख मेहरूंनीसा यांना ४ मते मिळाली. जिल्हाधिकारी यादव यांनी गवळी यांची उपमहापौर पदी निवड झाल्‍याचे जाहीर केले. 

अधिक वाचा : जळगाव : दोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार 

भगवान गवळी म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास वाया जाणार नाही. शहराच्या विकासासाठी  काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी माजी मंत्री तथा खासदार डॉ सुभाष भामरे, भाजपचे महानगरप्रमुख अनुप अग्रवाल, नगरसेवक हिरामण गवळी, महापौर चंद्रकांत सोनार आदी उपस्‍थित होते.

Back to top button