बुलडाणा : २० दिवसात मिळाला पीडितेला न्याय | पुढारी

बुलडाणा : २० दिवसात मिळाला पीडितेला न्याय

बुलडाणा; पुढारी वृत्तसेवा : न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वर्षानुवर्षे खटले प्रलंबित राहणे, ‘तारीख पे तारीख’ ला पक्षकार कंटाळणे असे अनुभव ऐकण्यात येत. ‘उशिराने न्याय हा एका अर्थाने अन्याय’ असेही म्हटले जाते; परंतू या समजूतींना छेद देत मेहकर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने अवघ्या २० दिवसांत खटल्याचा निवाडा  केला.

अधिक वाचा : बीड : दरोडेखोरांची टोळी जेरबंद

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार, एका पीडित महिलेने २ जून २०२१ रोजी मेहकरचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एस. ए. सुरजूसे यांचे न्यायालयात याचिका दाखल केली. यावर २० दिवसात आठवेळा सुनावणी घेऊन न्यायालयाने खटल्याचा निवाडा केला. पीडित महिलेच्या पतीला त्यांच्या आठ वर्षीय मुलीच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये पंधरा दिवसाचे आत देण्याचे तसेच पत्नीला घरभाड्यासाठी पाच हजार व  पोटगी म्हणून पाच हजार रू.असा दंड न्यायालयाने पीडितेचा पती राजेश अर्जून जाधव याला सुनावला. तो सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला आहे. 

अधिक वाचा : ओबीसींचा प्रश्न कसा सोडवणार ते सांगा, त्यासाठी तुम्ही सत्तेत येण्याची गरज नाही : जयंत पाटील 

घराचे बांधकामासाठी माहेरहून पैसे आणण्याकरीता तो पत्नीला छळत असे. तसेच मद्यपान करुन मारपीट करीत असे. ८ महिन्यांपूर्वी त्याने आठ वर्षाच्या मुलीसह घराबाहेर काढले हाेते, असा आरोप पीडित महिलेने याचिकेतून केला होता. 

Back to top button