कोल्हापूर : ३५ जणांच्या वऱ्हाडात निघाला एक पॉझिटिव्ह, धाबे दणाणले! | पुढारी

कोल्हापूर : ३५ जणांच्या वऱ्हाडात निघाला एक पॉझिटिव्ह, धाबे दणाणले!

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : कोरोना विषाणूंचा संसर्ग आणि प्रादुर्भाव थोपविण्यासाठी पालिकेतर्फे सुरू असलेल्या रॅपिड अँटीजन तपासणीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ३५ जणांच्या वऱ्हाडातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. वऱ्हाडातील एक जण पॉझिटिव्ह आल्याने इतरांना आता काय करायचे आसाच प्रश्न सतावत आहे. 

अधिक वाचा : कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचा दुकाने दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय! एसपींची यशस्वी शिष्ठाई

कोरोना विषाणूंचा संसर्ग आणि प्रादुर्भाव थोपविण्यासाठी पालिकेतर्फे रॅपिड अँटीजन तपासणीची मोहिम राबविण्यात येत आहे. यातंर्गत कुरुंदवाड शहरात थिएटर चौकात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या १२६ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शहरतील वृंदावन पागे मंगल कार्यालयात वर पक्षाकडून विवाहासाठी आलेल्या ३५ वऱ्हाडीची तपासणी केली असता एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना औषधोपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे. 

अधिक वाचा : कोल्‍हापूर : ‘शिकारी खुद शिकार हो गया’

शहरात बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्याची तपासणी केली असता मजरेवाडी १, कुरुंदवाड ३, हेरवाड २, इचलकरंजी १, खिद्रापूर १, राजापूर १ अशा एकूण १० जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पॉझिटिव्ह मिळून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आलेल्या व्यापाऱ्यांनी दक्षता घेणे गरजेचे असून त्यांचीही रॅपिड तपासणी करून घ्यावी अशी नागरिकातून मागणी होत आहे. शहरात वाढत असलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता शहरवासीयातून व्यक्त होत असून आज मिळून आलेल्या रुग्णामुळे शहरात भीती निर्माण झाली आहे.

Back to top button