Cyber Fraud News: वाहतूक पोलिसांच्या नावाने फसवणुकीचा सपाटा; मागील आठ दिवसांत 15 तक्रारी

सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा
pcmc
cyber fraud pudhari News
Published on
Updated on

पिंपरी : वाहतूक पोलिसांच्या नावाने मोबाईलवर बनावट चालान पाठवून नागरिकांची फसवणूक करण्याच्या प्रकारांनी जोर धरला आहे. सायबर चोरट्यांनी 'RTO Traffic Challan.apk' नावाची एक फाईल व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावरून नागरिकांना पाठवण्याचा सपाटा लावला आहे. ही फाईल डाऊनलोड केल्यानंतर मोबाईलमध्ये मालवेअर (व्हायरस) घुसतो आणि त्याचे नियंत्रण थेट सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाते. यामुळे मोबाईलमधील वैयक्तिक आणि बँकिंग माहिती चोरली जाऊन आर्थिक नुकसान होत आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांकडे अशा प्रकारच्या तब्बल 15 तक्रारी मागील आठ दिवसांत दाखल झाल्या असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

काय होते फाईल डाऊनलोड केल्यानंतर?

सायबर गुन्हेगारांकडून पाठवलेली ’रज्ञि’ फॉरमॅटमधील ही बनावट फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड होताच, मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये व्हायरस सक्रिय होतो. यानंतर मोबाईलचा पूर्ण अ‍ॅक्सेस गुन्हेगारांच्या हातात जातो. त्यामुळे ओटीपी, बँकिंग अ‍ॅप्स, यूपीआय व्यवहार, ई-मेल आयडी, संदेश, कॉल लॉग अशा गोपनीय माहितीवर त्यांना नियंत्रण मिळते. या माहितीचा वापर करून ते मोबाईलमधून थेट बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करतात, नवीन सिमकार्डसाठी विनंती करतात, मोबाईलमधील माहिती बदलतात किंवा काहीवेळा मोबाईल लॉक करून पैसेही मागतात.

घाबरवणारे मेसेज, बनावट लिंकचा वापर

तुमच्या वाहनावर दंड आहे, तुमच्यावर कोर्ट नोटीस आहे, तुमचा परवाना निलंबित होणार आहे, अशा आशयाचे मेसेज पाठवून रज्ञि फाईल अथवा लिंक उघडण्यास भाग पाडले जाते. नागरिक घाबरून ती फाईल उघडतात आणि त्यातून फसवणुकीची सुरुवात होते. या प्रकारात बनावट वेबसाइट्सचा वापर केल्याचेही समोर आले आहे. यामध्ये 'mahatrafficechallan.in', 'punetrafficpay.com अशा नावाच्या खोट्या संकेतस्थळांचा समावेश आहे. या लिंक्स अधिकृत वेबसाइटसारख्या दिसतात. त्यामुळे नागरिक गोंधळून त्या लिंकवर क्लिक करतात. त्यामध्ये वाहन क्रमांक टाकायला सांगितले जाते आणि माहिती भरताच मोबाईलमध्ये व्हायरस इन्स्टॉल होतो.

खरे चालान इथेच तपासा..

वाहन चालानाबाबतची अधिकृत माहिती फक्त 'mahatrafficechallan.in', 'punetrafficpay.com या संकेतस्थळावरूनच मिळते. या वेबसाइटचा शेवट 'gov.in' असा असतो. याशिवाय 'com', 'org', 'in' अशा शेवट असलेल्या कोणत्याही वेबसाइट्सवरून चालान पाठवले जात असेल, तर त्या लिंक्स बनावट असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अशी कोणतीही लिंक किंवा फाईल आल्यास ती न उघडता तात्काळ डिलीट करून सायबर पोलिसांकडे तक्रार द्यावी.

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी

  • कोणतीही अज्ञात फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नका

  • मोबाईलमध्ये Two-Step Verification Mmby चालू ठेवा

  • बँकिंग अ‍ॅप्ससाठी स्वतंत्र पासवर्ड ठेवा व वेळोवेळी तो बदला

  • मोबाईलमध्ये विश्वासार्ह अँटीव्हायरस अ‍ॅप असावे

  • मोबाईलवर आलेल्या कोणत्याही चालान लिंकवर क्लिक करण्याआधी त्याची खातरजमा करावी

  • लिंक असलेल्या वेबसाइटचा शेवट 'gov.in' किंवा'nic.in' असा आहे का, हे तपासावे

  • फसवणूक झाल्यास तात्काळ www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा

  • मदतीसाठी 1930 या टोल फ्री क्रमांकावर सायबर हेल्पलाइनशी संपर्क साधा

मागील काही दिवसांत ’ठढज ढीरषषळल उहरश्रश्ररप.रज्ञि’ नावाची फाईल पाठवून अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ही फाईल एकदा उघडली की मोबाईलचे नियंत्रण सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जाते. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही फाईल अथवा लिंक उघडण्यापूर्वी तिची खातरजमा करावी. खरे चालान फक्त अधिकृत वेबसाइटवरच असते. इतर कुठलीही फाईल अथवा लिंक ही बनावट असण्याची शक्यता जास्त असते.

रविकिरण नाळे, वरिष्ठ निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news