Maharashtra Assembly Polls: शंकर जगताप यांच्या प्रचाराचा ‘श्रीगणेशा’

मतदारांना अभिवादन करून मागितला विजयाचा आशीर्वाद
Maharashtra Assembly polls
शंकर जगताप यांच्या प्रचाराचा ‘श्रीगणेशा’Pudhari
Published on
Updated on

Political News: चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस - आरपीआय (आठवले) मित्रपक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराचा मंगळवार (दि. 29) थेरगाव येथे शुभारंभ झाला. गणेशनगर येथील श्री गणरायाच्या चरणी नारळ वाढवून भव्य पदयात्रा काढण्यात आली.

या वेळी माजी उपमहापौर झामाताई बारणे, चिंचवड विधानसभा प्रचारप्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, माजी नगरसेवक संतोष बारणे, शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव विश्वजित बारणे, माजी नगरसेवक गोरक्षनाथ पाषाणकर, आरपीआय पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर, भारत केसरी पै. विजय गावडे, बबलू सोनकर, अभिषेक बारणे, राकेश बारणे, सनी बारणे, दिगंबर गुजर, करिष्मा बारणे, राजेश पुरोहित, रवी भिलारे, विनोद फंड, रशीद शेख, रोहन कुंभार, प्रताप बारणे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकमान्य कॉलनी, दुर्गा कॉलनी, गणपती मंदिररोड, एकता कॉलनी, बुद्धविहार, शिव कॉलनी, ओंकार कॉलनी, मंगल नगर, प्रेरणा शाळा रोड, गुजर नगर, संतोष नगर, जयभवानी नगर, 16 नंबर, गणेश कॉलनी, शिवदर्शन कॉलनी मार्ग, स्वप्न पुष्प कॉलनी, आदर्श कॉलनी, कन्हैया पार्क, ओंकार पार्क, बारणे कॉर्नर, पवार नगर, क्रांतिवीर नगर, तुळजाई कॉलनी, वनदेव नगर, आनंदवन सोसायटी, अभिजित पार्क, रॉयल कोर्ट, आनंद पार्क, श्रीकृष्ण कॉलनी, भोईर इस्टेट, डांगे चौक, डांगेचौक - चिंचवडरोड, सदाशिव कॉलनी दत्त मंदिर, दत्तनगर, अरुण पार्क या भागात भव्य पदयात्रा काढत जगताप यांनी नागरिकांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले.

थेरगावमधील नागरिकांनीही मोठ्या उत्साहात जगताप यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले. या वेळी महिलांनी जागोजागी जगताप यांचे औक्षण केले. आम्ही तुमच्यासोबत आहोत हा विश्वास दिला. पदयात्रेदरम्यान जगताप यांनी थेरगावमधील तक्षशिला बुद्धविहारासह विविध धार्मिक स्थळांना आणि समाज मंदिरांना भेट दिली. या वेळी समाजबांधवांच्या वतीने जगताप यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news