

पिंपरी : मागील काही वर्षांपासून देशभरात घातक शस्त्रांच्या ऑनलाईन मार्केटचा व्याप झपाट्याने वाढत आहे. गुन्हेगारांना धारदार तलवारी, चाकू, कुकरी, कोयते, कुऱ्हाडी अशा हत्यारांचा पुरवठा आता घरपोच सेवेद्वारे सहज होत आहे. या धोकादायक उपलब्धतेमुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे अशा राजरोस सुरू असलेल्या ऑनलाईन गोरखधंद्यावर कोणाचाही ठोस ‘वॉच’ नसल्याचे चित्र समोर आले आहे.
घटना
मागील काळात औरंगाबाद येथे एका कुरिअर कंपनीत तलवारींचा मोठा साठा मिळून आला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील दिघी पोलिसांनीदेखील मोठी कारवाई करत कुरिअरमार्फत मागविलेल्या 97 तलवारी, दोन कुकरी आणि नऊ म्यान असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. या प्रकरणात उमेश सुद (अमृतसर, पंजाब), अनिल होन (औरंगाबाद), मनिंदर (अमृतसर, पंजाब) आणि आकाश पाटील (चितली, ता. राहता, जि. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
राज्याबाहेरील व्यापाऱ्यांचा सहभाग
दिघी येथील कारवाईनंतर ऑनलाईन उपलब्ध होणाऱ्या घातक शस्त्रांचा मुद्दा ठळकपणे समोर आला होता. मात्र, या व्यवहारांवर कोणत्याही यंत्रणेने अद्याप ठोस अंकुश ठेवलेला नाही. आजही ‘गुगल’वर ‘ ईूी डुेीव जपश्रळपश” किंवा ‘ईूी डहर्ळींरक्षळ एीर थशरेिप” असा शोध घेतल्यास अनेक वेबसाईट्स संपर्क क्रमांकासह दिसून येतात. राज्याबाहेरील व्यापारी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून देशभर शस्त्रांचा पुरवठा करत आहेत.
शस्त्रविरोधी मोहीम प्रभावी
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील अवैधशास्त्रांचे रॅकेट मुळासकट उखडून टाकण्यासाठी चार वेळा शस्त्रविरोधी मोहीम राबवली. यामध्ये शेकडो पिस्तूल आणि हजारो घातक शस्त्र पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची राज्यभर चर्चा झाली. अशाच प्रकारे पोलिसांनी सोशल मीडियावर वॉच ठेवून शस्त्र विक्री करणाऱ्यांना चाप लावण्याची गरज आहे.
संशयास्पद पार्सलबाबत माहिती देणे गरजेचे
एक किंवा दोन हत्यारे स्वतंत्र पार्सलद्वारे कुरिअर होत असल्याने पोलिसांना वा कुरिअर कंपन्यांना याची खबर लागत नाही. दरम्यान, पोलिसांनी सर्व कुरिअर कंपन्यांना संशयास्पद पार्सलचे काळजीपूर्वक स्कॅनिंग करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. काही कंपन्यांनी या सूचनांचे पालन करून मोठ्या प्रमाणातील साठ्याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. मात्र, बहुतेक कंपन्यांनी व्यावसायिक हिताच्या कारणाने मौन धारण केले आहे, असे मत पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. यामुळे सध्या संपूर्ण राज्यात घातक शस्त्रांची ऑनलाईन विक्री राजरोसपणे सुरू आहे.
नियमांना केराची टोपली
भारतीय हत्यार कायद्यानुसार 9 इंचांपेक्षा लांब आणि 2 इंचांपेक्षा रुंद धार असलेले कोणतेही शस्त्र बाळगणे हा गुन्हा आहे. मात्र, अनेक ऑनलाईन कंपन्या या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अशा शस्त्रांची विक्री करत आहेत. त्यामुळे या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रायव्हसीच्या नावाखाली लपवा-छपवी
9 इंचांपेक्षा लांब आणि 2 इंचांपेक्षा रुंद शस्त्र खरेदी करणाऱ्या ग््रााहकांचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, खरेदीची तारीख, होम डिलिव्हरीची वेळ आणि स्वरूप आदी माहिती पोलिसांना देणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश कंपन्या ‘ग््रााहक प्रायव्हसी’ चा हवाला देत ही माहिती देण्यास नकार देतात. अशा प्रकारच्या माहितीच्या अभावामुळे तपास प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांकडून नियमित कारवाई करण्यात येते. ऑनलाईन कंपन्या भारतीय हत्यार कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर त्यांच्यावर प्रचलित कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
डॉ. शशिकांत महावरकर, सहआयुक्त, पिंपरी- चिंचवड