Navratri Special 2024 | नवरात्रानिमित्त मातीचे आकर्षक घट
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर विविध आकाराच्या सुंदर नक्षीकाम केलेले मातीचे घट बाजारात विक्रीस आले आहेत. यामध्ये गुजराती पद्धतीचे घटही बाजारात उपलब्ध झाले आहेत. नवरात्रीसाठी एक ते दीड महिन्यापासून घट तयार केले जात आहेत.
नवरात्रीनिमित्त घरोघरी घट स्थापना होते. नवरात्री सुरू होण्यासाठी दोन दिवसांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे बाजारपेठेत रस्त्यावर घट विक्री करणारे दिसू लागले आहेत.
घटांवर अत्यंत सुबक कलाकुसर आणि मोहक नक्षीकाम केले जात आहे. घटावरचे रंगकाम आणि कलाकुसर यावर ही किंमत ठरवली जाते. काही ठिकाणी या घटात दिवे लावून त्याभोवती गरब्याचा फेर धरला जातो, तर काहीजण या घटाचा घटस्थापनेसाठी वापर करतात.
घटस्थापनेचे प्रांतानुसार वेगवेगळे प्रकार पहावयास मिळतात. महाराष्ट्रामध्ये काळ्या रंगाच्या घटांना मागणी असते. हे घट पाझरणारे असावे लागतात.
तर दुसरीकडे परप्रांतीय लोकांमध्ये कलाकुसर केलेले व वरती झाकण असलेले शोभिवंत घट बसविले जातात त्यामुळे कुंभारवाड्यात अशा दोन्ही प्रकारचे घट बनवीले जातात.