कोरोनाचे ९८१, म्युकर मायकोसिसचे ९ रुग्ण | पुढारी

कोरोनाचे ९८१, म्युकर मायकोसिसचे ९ रुग्ण

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे, सोमवारी दिवसभरात 981 नवे रुग्ण आढळले. 1130  जण कोविडमुक्त झाले.  दिवसात 31 जणांचे बळी गेले. 1813 जण गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर म्युकरमायसोसिस नवे 9 रुग्ण सापडले आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 1 लाख 18 हजार 367 झाली   आहे.  सध्या  11  हजार 933 व्यक्ती उपचाराखाली आहेत. आज दिवसभरात आरटीपीसीआरच्या   2071 तपासण्या करण्यात आल्या. यातील 419 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर  3534  जणांच्या अ‍ॅन्टिजन टेस्ट केल्या. यात 580 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती तालुकानिहाय :  आटपाडी : 24, कडेगाव : 66, खानापूर : 87, पलूस : 39, तासगाव :62, जत : 108, कवठेमहांकाळ : 76, मिरज :114,  शिराळा : 132, वाळवा : 171 , सांगली शहर : 75, मिरज : 27.  गेल्या काही       दिवसांपासून   मृत्यूचा   आकडा कमी होत चालला आहे.  आज सांगलीसह इतर जिल्ह्यातील  31   जणांचे बळी गेले. आटपाडी तालुक्यात 1, कडेगाव तालुक्यात 2, खानापूर तालुक्यात 2,  पलूस तालुक्यात 1,  तासगाव तालुक्यात 2,   जत तालुक्यात 1,    मिरज तालुक्यातील 2,   वाळवा तालुक्यात 4, शिराळा तालुक्यात 1, सांगली 4, मिरज2, कुपवाडमध्ये 1  अशा   30  व्यक्तींचा मृत्यू झाला. 

तसेच   सोलापूर जिल्ह्यातील 1,  कर्नाटकामधील 1, कोल्हापूर जिल्ह्यातील 4, सातारा जिल्ह्यातील 2 अशा  8   जणांचा आज सांगलीत     उपचारादरम्यान मृत्यू झाला.  आजअखेर  जिल्ह्यातील  एकूण 3424  व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.  

आज परजिल्ह्यातील सोलापूरमधून  आलेल्या 2,  कोल्हापूर जिल्ह्यातील 8,   सातारा   जिल्ह्यातील  2,  कर्नाटकमधील 5, पुण्यातील 1 अशा 18  पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.  होम आयसोलेशनमध्ये   9464 व्यक्ती आहेत.

आजअखेर तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह

आटपाडी : 7786  जत : 10195

कडेगाव : 7983  क. महांकाळ : 6399  खानापूर : 9758  मिरज : 12682 

पलूस : 5765 

शिराळा : 6282  तासगाव : 9208  वाळवा : 14220  महापालिका क्षेत्र : 27,989 

Back to top button