सातारा : भाजीपाला घरपोच; किराणा बंदच ८ जूनपर्यंत निर्बंध कायम  | पुढारी

सातारा : भाजीपाला घरपोच; किराणा बंदच ८ जूनपर्यंत निर्बंध कायम 

सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी किराणा माल व इतर अत्यावश्यक सेवा बंद ठेवल्या आहेत. मात्र दूध आणि भाजीपाला घरपोच सेवा व कृषी सेवा केंद्रे विहित वेळेत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित आस्थापना  8 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत सध्याचा लॉकडाऊन  15 मेपर्यंत वाढवला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही साखळी तुटण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दि. 8  रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊनसंदर्भात सुधारित आदेश जारी केले.  जिल्ह्यात संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली असून वैध कारण व परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी करण्यात आली आहे. मात्र या आदेशातून काही आस्थापनांना वगळण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद राहणार आहेत. अत्यावश्यक बाबींतील  सेवांना सवलत देण्यात आली असून आस्थापनांना (एुशािींळेप उरींशसेीू) यांना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत परवानगी  आहे. 

‘या’ अत्यावश्यक सेवांना परवानगी

रुग्णालये, निदान केंद्रे दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी आहे. व्हेटरीनरी हॉस्पिटल्स,  अ‍ॅनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स सुरु राहतील. दूध संकलन केंद्रे सकाळी  7 ते 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र ही परवानगी फक्त घरपोच दूध वितरणास आहे.  शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु असेल. स्टॉक एक्सचेंज डिपॉजिटर्स व क्लिअरींग कार्पोरेशन  व नोंदणीकृत असलेले एजंट, टेलीकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरविणार्‍या सेवा,  फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणेसाठी ई – व्यापार,  प्रसार माध्यमे (चशवळर), पेट्रोल/डिझेल पंप अत्यावश्यक सेवांतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने व शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने,प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी, माल वाहतूक करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील. पाणी पुरवठा सेवा,सर्व प्रकारची माल वाहतूक सेवा, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, विद्युत व गॅस पुरवठा सेवा, टेलीफोन सेवा.  टपाल सेवा सुरु राहिल. रास्त भाव दुकाने सकाळी 7  ते सकाळी 11 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. औषध दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरु राहतील मात्र हॉस्पीटलमधील औषध दुकाने 24 तास सुरु ठेवण्यास परवानगी आहे. 

सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या फळे, भाजीपाला घाऊक खरेदी विक्रीसाठी सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असून  या वेळेत फक्त घाऊक व्यापार्‍यांना खरेदी करता येणार असून किरकोळ ग्राहक व किरकोळ विक्रेत्यांना खरेदीस मनाई आहे. घाऊक व्यापार्‍यांनी किरकोळ व्यापार्‍यांना भाजीपाला विक्री  करायची असून संबंधित ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घेवून फिजिकल डिस्टन्सींगचे पालन करावे. घरपोच भाजीपाला व फळे सकाळी 7 ते दुपारी 3  या कालावधीत पुरवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वस्तू व माल यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध नसून ते लोकांच्या हालचालीवर आहेत.  अत्यावश्यक  सेवेतील दुकानातील मालक, कर्मचारी किंवा ग्राहकाने नियमांचे उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड करण्यात येणार आहे. ग्राहक नियमांचे पालन करत नसतानाही दुकानदाराकडून सेवा दिली जात असेल तर त्या  दुकानदाराला 1 हजार रुपये दंड केला जाणार आहे.

या आस्थापना बंद राहणार

व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील. खाद्यपदार्थ विक्रेते, उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट, भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील. वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना,मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री पूर्णपणे बंद राहणार आहे. सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापरी दुकाने, बेकरी,  माल वाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज,  स्पेअरपार्ट दुकाने पूर्णपणे बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाव्दारे विहित केलेल्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणे बंद राहतील. संबंधित बँकांतून फक्त शेतकर्‍यांना  खरीप हंगामाच्या अनुषंगाने पीक कर्जाचे कामकाज, एटीएममध्ये पैसे भरणे, उहर्र्शिींश उश्रशरीरपलश, ऊरींर उशपीींश ही कामे कार्यालयीन कामकाजादिवशी  11 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी असून  बँकांचे उर्वरित सर्व कामकाज पूर्णपणे बंद राहणार आहे.

प्रवासी वाहतुकीवर मर्यादा 

जिल्ह्यात एसटी सेवा बंद राहणार आहे. रिक्षा, टॅक्सी अतितत्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी 50 टक्के प्रवासी क्षमतेने सुरु राहतील.  प्रवास करणार्‍या व्यक्तींने मास्क न वापरल्यास 500 रुपये दंड केला जाणार आहे.  रेल्वे मध्ये मास्क परिधान न करणार्‍या व्यक्तीला 500 रुपये दंड केला जाणार आहे. सर्व खाजगी प्रवासी वाहतूक अतितत्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी सुरु राहील. खाजगी प्रवासी वाहतूक ही प्रवासी आसन क्षमतेच्या 50 टक्के प्रवासी क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी आहे. ही वाहतूक आंतर जिल्हा किंवा आंतर शहर  अशी अपेक्षित नाही.  प्रवाशांच्या राहत्या शहरापुरतीच ही वाहतूक मर्यादित असावी.  निर्बंधांचा भंग करणार्‍या व्यक्तीस 10 हजार रुपये दंड केला जाणार आहे.

या कार्यालयांना सवलत 

केंद्रीय, राज्य आणि स्थानिक प्रशासनाची सर्व कार्यालये आणि त्यामध्ये समाविष्ट  वैधानिक प्राधिकरणे व संस्था. अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या कंपनींची कार्यालये. औषध उत्पादन व वितरणा सबंधित नियोजन करणार्‍या कार्यालयांचा समावेश आहे.

कोरोनासंदर्भात अत्यावश्यक सेवेशी निगडीत शासकीय कार्यालये वगळता सर्व शासकीय कार्यालये 15 टक्के क्षमतेच्या उपस्थितीसह सुरु राहणार आहेत. या अधिकारी व कर्मचार्‍यांना मनाई आदेशातून वगळण्यात आले आहे. अभ्यागतांना शासकीय कार्यालयात किंवा कंपनीत येणेस प्रतिबंध आहे.

रेस्टॉरंट, बार, हॉटेलवर निर्बंध

 हॉटेल्स (लॉजिंग) फक्त अंतर्गत प्रवाशांसाठी सुरू राहणार आहे.  बार बंद राहतील. हॉटेल्समधील रेस्टॉरंट फक्त निवासी ग्राहकांसाठी सुरु राहील.  नियमाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तीवर 1 हजाराचा तर आस्थापनेवर 10 हजार रुपये दंड केला जाणार आहे.            

वृत्तपत्रे कार्यालये सुरुच

वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी आहे. फक्त  घरपोच सेवा सुरु राहणार असून या ठिकाणी काम करणार्‍या सर्व कर्मचारी यांनी केंद्र शासनाच्या निर्देशांप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.

मंदिरे, करमणूक, सिनेमागृहे बंद

सर्व धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम प्रतिबंधित आहे. शाळा व महाविद्यालये, केशकर्तनालये, स्पा, सलून, ब्युटी पार्लर्स,  प्रार्थना स्थळे, मंदिरे, करमणूक दुकाने, मॉल्स, शॉपिंग सेंटरर्स, सिनेमागृह,  नाट्यगृहे व सभागृहे,  करमणूक नगरी, व्हिडीओ गेम पार्लर,  जलक्रीडा स्थळे, जलतरण तलाव, व्यायामशाळा व क्रीडा संकुले,  छायाचित्रण (शूटिंग) अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट नसणारे सर्व दुकाने,  सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवायची आहेत. 

जिल्हयातील विद्यार्थ्यासाठी घेण्यात येणार्‍या परीक्षांना परवानगी देण्यात येत असून सबंधित विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास परीक्षेबाबत पूर्व कल्पना देणे आवश्यक असेल.  मात्र खाजगी कोचिंग क्लासेस बंद राहतील. 

लग्न सोहळ्यासाठी दोनच तास

लग्नसमारंभासाठी  25 जणांनाच परवानगी असून लग्नासाठी 2 तास वेळ देण्यात आला आहे. नियमाचे पालन न करणार्‍या 50 हजारांचा दंड केला जाणार असून संबंधित कार्यालय सील केले जाणार आहे. अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

या आदेशात कुणालाही बदल करता येणार नसून नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा अंमगलावणी करण्यास कुणी टाळाटाळ केली तर संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

बळीराजाला दिलासा

शेती विषयक सेवा व शेती सुरू राहण्यासाठी शेतकर्‍यांना आवश्यक असणारी बियाणे, खते, शेती विषयक उपकरणे व त्यांची दुरुस्ती व देखभाल पुरवणार्‍या सेवांची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे. तसेच कृषी साहित्याची घरपोच सेवा सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना विक्रेत्यांकडे ऑनलाईन किंवा फोन संपर्काने मागणी करावी लागणार आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्ग बी-बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशकांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो. कृषी दुकाने सुरू झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

Back to top button