रत्नागिरी जिल्ह्यात नवे ५८२ रुग्ण | पुढारी | पुढारी

रत्नागिरी जिल्ह्यात नवे ५८२ रुग्ण | पुढारी

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात नव्याने 582 रुग्ण सापडले असून, जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण आता वाढू लागले आहे. जिल्ह्यातील रुग्ण मिळण्याचे प्रमाण टेस्टिंगच्या तुलनेत अद्यापही 17 टक्क्यांच्या वर आहे. मागील पाच दिवसांत तब्बल तीन हजारांहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील चोवीस तासांत 3390 जणांची टेस्टिंग करण्यात आली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही टेस्टिंग वाढवण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावरही टेस्टिंग करण्यात येत आहे. रुग्ण सापडणार्‍या वाड्यांवर प्रशासनाने आता अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात नव्याने 582 रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांचा आकडा 39 हजार 633 वर पोहोचला आहे. 16 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 1306 झाली आहे. मृतांची टक्केवारी 3.34 असून ती तीन टक्केच्या खाली येणे गरजेचे आहे. 

शुक्रवारी दिवसभरात 329 जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांचा आकडा 33 हजार 420 पर्यंत गेला आहे. जिल्ह्यात सध्या 4,325 अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

Back to top button