मुंबईतील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये घट | पुढारी | पुढारी

मुंबईतील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये घट | पुढारी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबईतील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेवर नियंत्रण मिळविणार्‍या पालिकेने आता म्युकरमायकोसिसच्या म्हणजेच काळ्या बुरशीवर नियंत्रण मिळवत असल्याचा दावा केला आहे. जनजागृती आणि वेळेवर उपचारांमुळे, जेथे रुग्ण बरे होत आहेत,तेथे नवीन रुग्णांची संख्याही घटताना दिसत आहे. काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या 50 टक्क्यांपेक्षा खाली आली आहे, असे पालिकेचे अधिकारी सांगतात.

काळ्या बुरशीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने एक आराखडा तयार केला आणि त्याची अंमलबजावणीही केली. कोरोनाप्रमाणेच, म्युकरमायकोसिस नियंत्रित करण्यासाठी पालिकेने टास्क फोर्सची स्थापना केली आहे.  त्याशिवाय काळ्या बुरशीने ग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी पालिकेने आपल्या प्रमुख रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार केले आहेत.

प्रभागाच्या पातळीवरही या आजारासंदर्भात जनजागृती सुरू करण्यात आली. या जनजागृतीच्या माध्यमातून पालिका कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची काळजी कशी घ्यावी, कोणती खबरदारी घ्यावी, याबद्दल माहिती देण्यात येत आहे.

या कारणांमुळे मुंबईतील म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या कमी होत आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, पूर्वी दररोज रोगाचे 10 ते 15 रुग्ण दररोज उपचारासाठी रुग्णालयात येत असत. आता केवळ 2 ते 3 रुग्ण रुग्णालयात दररोज येत आहेत. काकाणी यांच्या म्हणण्यानुसार, काळ्या बुरशीचे 350 रुग्ण मुंबईतील सरकारी आणि खासगी रुग्णालयांत दाखल आहेत. पूर्वी ही संख्या 400 च्या वर होती. आतापर्यंत या बुरशीने 59 लोकांचा बळी घेतला आहे, ज्यामध्ये 18 रुग्ण मुंबईचे आहेत. कोरोना नियंत्रित झाल्यापासून एका महिन्यात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता टास्क फोर्सने व्यक्त केली होती, परंतु आता ही परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे.

केंद्राकडून आतापर्यंत 4,700 इंजेक्शन्स

काळ्या बुरशीने ग्रस्त रुग्णांच्या उपचारात केंद्र सरकारने प्रभावी अ‍ॅम्फोटेरोसिन इंजेक्शन पाठवली आहेत.आता हे इंजेक्शन केंद्रातून रुग्णांच्या संख्येच्या आधारे राज्यांना पुरविले जात आहे. मुंबई पालिका आतापर्यंत केंद्राकडून राज्यात इंजेक्शनच्या कोट्यातून 4700 इंजेक्शन्स पुरवली आहेत.

 

Back to top button