खासगीत घेताय लस? बातमी आपल्यासाठी! | पुढारी | पुढारी

खासगीत घेताय लस? बातमी आपल्यासाठी! | पुढारी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : देशभरातील लसीकरणाची सूत्रे केंद्र सरकारने आपल्या हाती घेतली असली तरी खासगी रुग्णालयांमध्येदेखील कोरोना प्रतिबंधक लस घेता येईल. हे प्रमाण तब्बल 25 टक्के असेल. म्हणजे देशात 75 टक्के लसीकरण सरकारी तर 25 टक्के लसीकरण खासगी पातळीवर आता सुरू होईल.

अधिक वाचा : ‘राजकीय मतभेद होणे म्हणजे व्यक्तिगत नाते सैल पडले असे होत नाही’ 

खासगी दवाखान्यांत लसीकरणाचे दर किती असावेत हेदेखील केंद्र सरकारने जाहीर केले असून, त्यासाठीचे कोष्टकच आता उपलब्ध आहे. पुढारीने इथे प्रसिद्ध केलेला हा तक्‍ता खिशात ठेवला तरी कोणत्याही दवाखान्यात डोस घेताना किती पैसे द्यायचे हे तुमच्या लक्षात राहील आणि अर्थातच फसवणूक होणारा नाही. 

तीन लसींचे तीन दर


   लस     कंपनी किंमत   जीएसटी    सेवा शुल्क    एकूण किंमत

कोविशिल्ड     600 रु.      30 रु.       150 रु.        780 रु.

स्पुतनिक-व्ही    948 रु.    47 रु.       150 रु.       1145 रु.

कोव्हॅक्सिन     1200 रु.    60 रु.       150 रु.       1410 रु.

केंद्राच्या आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, खासगी दवाखान्यांमध्ये सर्वात स्वस्त डोस कोविशिल्डचा असेल, तर सर्वात महाग कोव्हॅक्सिन मिळेल. प्रत्येक लसीचे दोन डोस बंधनकारक असल्याने इथे दिलेल्या किंमतीनुसार दोनदा पैसे मोजावे लागणार आहेत. लस उत्पादन करणार्‍या कंपनीने ठरवलेली किंमत, जीएसटी आणि हा डोस टोचण्यासाठी रुग्णालयाकडून आकारले जाणारे सेवा शुल्क असे तीन घटक मिळून एकूण किंमत निश्‍चित करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : बंद दाराआड काय ठरलंय काय?

21 जूनपासून केंद्राच्या नवीन धोरणानुसार लसीकरण मोहीम सुरू होणार असली तरी त्यातही पुन्हा गर्दी, रांगा आणि प्रतीक्षा अटळ आहे. राज्यांना लस पुरवण्यासंदर्भात केंद्राने घातलेल्या अटींची पूर्तता न झाल्यास हा पुरवठा केंद्राकडून कमी देखील केला जावू शकतो. त्यातून सरकारी लसींची टंचाई निर्माण होण्याची भीती आहेच. अशा स्थितीत सधन मुंबईकरांना खासगी लसीचा पर्याय अधिक जवळचा वाटू शकतो, असे जाणकारांना वाटते. 

Back to top button