येडियुराप्पांविरोधी गट पुन्हा सक्रिय? | पुढारी | पुढारी

येडियुराप्पांविरोधी गट पुन्हा सक्रिय? | पुढारी

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा 

भाजप पक्षश्रेष्ठींनी नेतृत्वबदलाबाबतचा गोंधळ दूर केला तरी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचा विरोधी गट पुन्हा सक्रिय झाला आहे. आमदार अरविंद बेल्लद तातडीने दिल्लीला रवाना झाले असून पक्षश्रेष्ठींच्या भेटीचा प्रयत्न ते करत आहेत. 

शुक्रवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी पुढील दोन वर्षे आपणच मुख्यमंत्री असल्याचे जाहीर केले होते. भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी येडियुराप्पा नावाला पक्षश्रेष्ठींना कर्नाटकात कोणताही नेतृत्वबदल करायचा नसल्याचे सिंग यांनी दिल्लीमध्ये जाहीर केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी आपली जबाबदारी वाढल्याचे सांगितले होते. पण, शनिवारी आमदार अरविंद बेल्लद तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांनी आपली भेट खासगी असून याचा राजकारणाशी संबंध नसल्याचे सांगितले. पण, पुराव्यांसह ते पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळाली आहे. येडीपुत्र विजयेंद्र यांचा प्रशासनातील हस्तक्षेप वाढला आहे त्यावर नियंत्रण हवे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांना पायउतार करण्याची मागणी बेल्लद करणार आहेत.

16 किंवा 17 जून रोजी कर्नाटक भाजप प्रभारी अरुण सिंग दौर्‍यावर येत आहेत. त्यांना पुराव्यासह तक्रारी करण्याची तयारी येडियुराप्पाविरोधी आमदार करत आहेत. नेतृत्वबदल करावे की नाही? याविषयी अहवाल तयार करून तो वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे.

दरम्यान,अरुण सिंग यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नेतृत्वबदलाच्या चाचपणीची जबाबदारी सोपवली आहे म. नेतृत्वबदलासाठी ते प्रत्येक आमदार, ज्येष्ठ नेत्यांची मते जाणून घेणार आहेत. येडियुराप्पांना पायउतार केल्यास निर्माण होणार्‍या समस्या म, पक्ष आणि सरकारवरील परिणामांबाबत अभिप्राय ते जाणून घेतील. 2023 मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीवेळी कोणाकडे नेतृत्व सोपवावे याची माहिती अरुण सिंग घेणार आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीवेळी करायच्या बदलांबाबत अरुण सिंग आढावा घेतील.

 

Back to top button