रंकाळ्यात सापडले महाकाय मृत कासव | पुढारी

रंकाळ्यात सापडले महाकाय मृत कासव

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

रंकाळा तलावात रविवारी रात्री महाकाय मृत कासव सापडले. जुना वाशी नाका परिसरात राहणार्‍या अभिजित यादव व त्यांच्या सहकार्‍यांना तलावात मोठे कासव तरंगताना दिसले. त्यांनी याची माहिती ‘वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी’चे सदस्य प्रदीप सुतार व प्राणिमित्र धनंजय नामजोशी यांना दिली. त्यांनी तातडीने येऊन मृत कासवाला पाण्याबाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी वन विभागाकडे सुपूर्द केले. गोड्या पाण्यातील इंडियन सॉफ्ट शेल जातीचे हे कासव 55 किलो वजनाचे असून, त्याचे वय सुमारे 80 वर्षांचे असल्याचे सांगण्यात आले. 

Back to top button