नव्याने ४७८ पॉझिटिव्ह तर ५२६ जण कोरोनामुक्‍त; १० मृत्यू | पुढारी

नव्याने ४७८ पॉझिटिव्ह तर ५२६ जण कोरोनामुक्‍त; १० मृत्यू

सिंधुदुर्गनगरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या हळूहळू आटोक्यात येताना दिसत आहे.मात्र, मृत्यूंची संख्या कमी होताना दिसत नाही. गुरुवारी आणखी 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृत्यूचा आकडा 911 वर गेला आहे. गुरुवारी नव्याने 478 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामुळे आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 36 हजार 206 झाली आहे. तर गुरुवारी 526 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

सक्रिय रुग्णसंख्या 6 हजार 187 असून यात  408 रुग्ण चिंताजनक स्थितीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली. आतापर्यंत 29 हजार 102 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 1 लाख 31 हजार 753 आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 25 हजार 671 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर 1 लाख 28 हजार 349 नमुन्यांची अँटीजन टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी 10 हजार 814 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

गुरुवारचे पॉझिटिव्ह रुग्ण 478

गुरुवारी 6 हजार 605 नमुने तपासण्यात आले.यात 478 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्वात जास्त 124  रुग्ण कुडाळ तालुक्यात मिळाले आहेत. तालुकानिहाय रुग्ण देवगड 56, दोडामार्ग 18, कणकवली 79, कुडाळ 124,  मालवण 72, सावंतवाडी 38, वैभववाडी 16, वेंगुर्ला 73, जिल्ह्याबाहेरील 2.

तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण

देवगड 4,396, दोडामार्ग 2,128, 

कणकवली 6,925, कुडाळ 7,162, मालवण 5,328, सावंतवाडी 5,284, वैभववाडी 1,620, वेंगुर्ला 3,184, जिल्ह्याबाहेरील 179.

6 हजार 187 सक्रिय रुग्ण

जिल्ह्यात 6 हजार 187 रुग्ण सक्रिय असून यात  देवगड 744, दोडामार्ग 211, कणकवली 1081, कुडाळ 1252, मालवण 1156, सावंतवाडी 770, वैभववाडी 307, वेंगुर्ला 640, जिल्ह्याबाहेरील 27.

तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू

देवगड 127, दोडामार्ग 27, कणकवली 182, कुडाळ 140, मालवण 167, सावंतवाडी 133, वैभववाडी 62, वेंगुर्ला 69 आणि जिल्ह्याबाहेरील 4 व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.

 

Back to top button