सांगली जिल्ह्यात कोरोनाचे ९०१ नवे रुग्ण  | पुढारी

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे ९०१ नवे रुग्ण 

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बुधवारी 901 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, तर  24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1 हजार 156 जण चिंताजनक आहेत. 863 जण कोरोनामुक्त झाले. बुधवारी म्युकर मायकोसिसचे 2 नवे रुग्ण सापडले.

जिल्ह्यात आजअखेर एकूण   पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 1 लाख 33 हजार 76 झाली    आहे.  सध्या  9  हजार 51 व्यक्ती उपचाराखाली आहेत. आज दिवसभरात आरटीपीसीआरच्या   2 हजार 847 तपासण्या करण्यात आल्या. यातील 333 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर 7 हजार 679 जणांच्या अ‍ॅन्टीजन टेस्ट केल्या. यात 596 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती तालुकानिहाय : आटपाडी : 30, कडेगाव : 54, खानापूर : 60, पलूस : 78, तासगाव : 52, जत : 60, कवठेमहांकाळ : 31, मिरज :87,  शिराळा : 61, वाळवा : 244, सांगली शहर : 109, मिरज : 35.  

बुधवारी जिल्ह्यातील 19 तर परजिल्ह्यातील 5 जणांच मृत्यू झाला.खानापूर 1, पलूस 2, तासगाव 2, जत 1, मिरज 2, शिराळा 2, वाळवा 4, सांगली शहर 3 आणि मिरज शहरातील 2 जणांचा समावेश आहे.

परजिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील 2, सातारा जिल्ह्यातील 2 आणि कर्नाटकातील एकाचा मृत्यू झाला.  आजअखेर  जिल्ह्यातील  एकूण 3796 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

आज परजिल्ह्यातील सोलापूर 2, कोल्हापूर 9, सातारा 4, पुणे 5, रत्नागिरी 2, परभणी 1, बीड 1 आणि कर्नाटकातील 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या 7 हजार 270 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

आजअखेर तालुका निहाय कोरोना पॉझिटिव्ह

 आटपाडी: 8331

 जत : 11132

 कडेगाव : 9213

 कवठेमहांकाळ : 7226

 खानापूर : 10685

 मिरज : 14426

  पलूस : 6835

   शिराळा : 7686

 तासगाव : 10299

 वाळवा : 17435

 महापालिका क्षेत्र : 29,878

Back to top button