किटवाड धरण ओव्हर फ्लो; धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची गर्दी | पुढारी

किटवाड धरण ओव्हर फ्लो; धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांची गर्दी

कुदनूर : पुढारी वृत्तसेवा

कालकुंद्री  हद्दीतील किटवाड नजीकचे धरण क्रमांक 1 हे 19 जूनला रात्री पूर्ण क्षमतेने भरले. धरणाच्या सांडव्यातील पाण्यामुळे तयार होणारा धबधबाही प्रवाहित झाला आहे. रविवारी पहिल्याच दिवशी येथे परिसरातील उत्साही पर्यटकांनी गर्दी केली होती.

या धरणाच्या सांडव्यावर बांधलेली नागमोडी भिंत, जवळच असलेला धबधबा, त्यावर बांधण्यात  आलेला लोखंडी पूल, किटवाड गावाच्या पूर्वेकडे कृष्णा खोरे योजनेतील धरण क्र. 2 यामुळे हा परिसर पर्यटकांना आकर्षित करून घेत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून बेळगाव परिसरातील पर्यटक आंबोली ऐवजी किटवाडला पसंती देत आहेत.

अतिउत्साही पर्यटकांचा त्रास

इथे  येणारे अतिउत्साही पर्यटक येताना आणलेल्या काचेच्या दारू बाटल्या, पाण्यासाठी आणलेल्या प्लास्टिक बाटल्या व इतर वस्तू कालकुंद्री हद्दीतील  नजीकच्या शिवारात फेकून देतात. याचा त्रास शेतकर्‍यांना होत आहे.

Back to top button