ऑलिम्पिकसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून लेन्नी दि गामा यांची निवड | पुढारी

ऑलिम्पिकसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून लेन्नी दि गामा यांची निवड

पणजी : पुढारी वृत्तसेवा 

टोकियो जपान येथे होणार्‍या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून गोवा बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष लेन्नी दि गामा यांची निवड झाली आहे. स्पर्धेतील सामन्यात निर्णय अधिकार्‍यांचे काम योग्य प्रकारे होत आहे का नाही याचे निरीक्षण आणि मूल्यांकन लेन्नी करणार आहेत. तांत्रिक अधिकारी म्हणून काम करणारे ते आशिया खंडातील एकमेव अधिकारी आहेत. याशिवाय युरोप खंडातून दोन व आफ्रिका खंडातून एकाची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये होणारी ही स्पर्धा आता 26 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.  याआधी लेन्नी यांनी जागतिक चॅम्पियनशिप आणि ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी निरीक्षक आणि मूल्यांकनकर्ता म्हणून काम केले आहे. 2012 साली झालेल्या लंडन ऑलिम्पिकच्या तांत्रिक समितीमध्येही त्यांनी काम केले आहे. लेन्नी यांच्या निवडीमुळे राज्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

 

Back to top button