नागरी वस्तीत शिरली मगर | पुढारी | पुढारी

नागरी वस्तीत शिरली मगर | पुढारी

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा

शहरात दरवर्षी अतिवृष्टीमुळे वाशिष्ठी व शिवनदीला पूर येतो. त्यावेळी या नद्यांतील मगरी पाण्याबरोबर शहरांमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे पावसाळ्यात चिपळूण शहरातील नाले व गटारांमध्ये मगरींचा मुक्त संचार असतो. शहरातील फैयाज  देसाई यांच्या घराजवळ शनिवारी सकाळी वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी महाकाय मगरीला जेरबंद करून अधिवासात सोडले.

शहरातील एका नागरिकाच्या घराशेजारी असलेल्या गटारांमध्ये एक महाकाय मगर सापडली. संबंधितांनी तत्काळ याबाबतची खबर वन विभागाला दिली. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी मगरीला जेरबंद केले. शहरातील वाशिष्ठी नदीपात्रात तिच्या अधिवासामध्ये सोडण्यात आले.

Back to top button