कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 33 हजार कोरोना टेस्ट; 1,725 बाधित | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 33 हजार कोरोना टेस्ट; 1,725 बाधित

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना रुग्णांचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढवले असून, बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक 33 हजार 616 चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 1,725 जण कोरोनाबाधित आढळले असून, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 9 हजार 52 इतकी असून, जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5.12 इतका आला आहे.

आरटी-पीसीआर आणि सीबीएनएएटी चाचण्यांच्या 3,551  प्राप्त अहवालांपैकी 3,145 अहवाल निगेटिव्ह, तर 350 अहवाल पॉझिटिव्ह (18 अहवाल नाकारण्यात आले आहेत). अँटिजेन चाचणीच्या 29,038 प्राप्त अहवालांपैकी 27,124 अहवाल निगेटिव्ह, तर 914 अहवाल पॉझिटिव्ह (1,390  अहवाल आरटी-पीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये तसेच लॅबमध्ये 1,045 प्राप्त अहवालांपैकी 604 निगेटिव्ह, तर 461 पॉझिटिव्ह असे एकूण 1,725 अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 1 लाख 45 हजार 374 पॉझिटिव्हपैकी 1 लाख 31 हजार 801 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1,725  पॉझिटिव्ह अहवालांपैकी आजरा-57, भुदरगड-51, चंदगड-16, गडहिंग्लज-66, गगनबावडा-4, हातकणंगले-221, कागल-55,  करवीर-381, पन्हाळा-144, राधानगरी-63, शाहूवाडी-36, शिरोळ-101, नगरपरिषद क्षेत्र-98, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-406, इतर जिल्हा व राज्यांतील-41 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील आजअखेर मृतांची संख्या 4 हजार 521 झाली आहे.

Back to top button