सांगली जिल्ह्यात कोरोनाचे ९४९ नवे रुग्ण : २५ जणांचा मृत्यू | पुढारी

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे ९४९ नवे रुग्ण : २५ जणांचा मृत्यू

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात  बुधवारी  कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.  जिल्ह्यातील 17 आणि परजिल्ह्यातील 8 अशा 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1 हजार 27 जणांची प्रकृती चिंताजनक  आहे. दिवसभरात 1001 जण कोरोनामुक्त झाले. बुधवारी म्युकर मायकोसिसचे 2 नवे रुग्ण आढळून आले.

जिल्ह्यात आजअखेर एकूण   पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 1 लाख 38 हजार 837 झाली    आहे.  सध्या  8  हजार 348 व्यक्ती उपचाराखाली आहेत. आज दिवसभरात आरटीपीसीआरच्या   2 हजार 318 तपासण्या करण्यात आल्या. यातील 364 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला. तर 7 हजार 843 जणांच्या अँटिजन टेस्ट केल्या. यात 606 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. 

आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती तालुकानिहाय :  आटपाडी : 9, कडेगाव : 35, खानापूर : 57, पलूस : 98, तासगाव : 48, जत : 45, कवठेमहांकाळ : 32, मिरज :101,  शिराळा : 81, वाळवा : 229, सांगली शहर : 176, मिरज : 38.  

बुधवारी जिल्ह्यातील 17 तर परजिल्ह्यातील 8 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये आटपाडी 1, कडेगाव 1, खानापूर 2, पलूस 2, तासगाव 1, जत 1, मिरज 4, वाळवा 3, सांगली शहरातील 2 जणांचा मृत्यू झाला. तर पर जिल्ह्यातील  कोल्हापूर 7 आणि सातारा जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला. आजअखेर  जिल्ह्यातील  एकूण 3 हजार 948 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

आज परजिल्ह्यातील सोलापूर 5, कोल्हापूर 10, सातारा 2, पुणे 1 अणि कर्नाटकातील 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या 6 हजार 794 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

आजअखेर तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह

आटपाडी : 8519

 जत : 11387

 कडेगाव : 9634

 कवठेमहांकाळ : 7448

 खानापूर : 11002

 मिरज : 15067

  पलूस : 7341

   शिराळा : 8120

 तासगाव : 10633

 वाळवा : 18880

 महापालिका क्षेत्र : 30,886

Back to top button