नाशिक : अतिक्रमणप्रश्‍नी झोडगेत रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

नाशिक : अतिक्रमणप्रश्‍नी झोडगेत रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : वारंवार तक्रार करुनदेखील अतिक्रमण काढले जात नसल्याने संतप्त शेतकर्‍याने अंगावर रॉकेल ओतून घेत झोडगे ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासनाला जाब विचारला. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या अनपेक्षित प्रकाराने एकच खळबळ उडाली. 

जळगाव : अल्‍पवयीन मुलीवर मामा, मावशाकडून अत्याचार 

हातात रॉकेलची डबकी घेऊन समाधान नेरकर हे कुटुंबियांसह झोडगे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दाखल झाले. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी अतिक्रमणाच्या मुद्द्यावरुन ‘सरपंच आणि ग्रामसेवक कुणाच्या दबावाखाली काम करतात, अशी विचारणा केली. आजच्या आज माहिती मिळालीच पाहिजे, कर्तव्य बजावता येत नसेल तर राजीनामा द्या.’ अशी मागणी केली. ‘माणसं पाहून कामं केली जातात, इतरांच्या तक्रारीवर चार दिवसांत कार्यवाही होते. अडाणी व्यक्ती आठ महिन्यांपासून पाठपुरावा करत असताना प्रशासन का दुर्लक्ष करतेय?’ अशी युवकांनी विचारणा केली. 

जळगाव : शोकाकूल वातावरणात शहीद सुनील हिरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

ग्रामपंचायतीतर्फे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असून, त्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरु आहे. त्यात थोडा अवधी लागेल, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर नेरकर आदींचे समाधान झाले नाही. या वादावरुन सध्या चर्चा सुरु आहे. अतिक्रमण काढा अन्यथा आंदोलन सुरुच ठेवणार असे नेरकर यांनी सांगितले.

Back to top button