ओबीसी आरक्षण रद्द होण्यास फडणवीस जबाबदार : पटोले | पुढारी

ओबीसी आरक्षण रद्द होण्यास फडणवीस जबाबदार : पटोले

मुंबई :  पुढारी वृत्तसेवा

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास केंद्र सरकार व तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. टिळक भवन या प्रदेश काँग्रेस मुख्यालयात ते बोलत होते.

सत्ता दिल्यास चार महिन्यांत आरक्षण आणतो, अन्यथा राजकीय संन्यास घेईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. परंतु त्यांची नौटंकी महाराष्ट्राला समजली असून जनताच आता फडणवीसांना संन्यास देईल, असे पटोले म्हणाले.

फडणवीस यांचा ‘खोटं बोल, पण रेटून बोल’ हा स्थायी भाव आहे. 2014 च्या निवडणुकीआधीही त्यांनी धनगर समजाला आरक्षणाचे आश्‍वासन दिले. पण पाच वर्षांत त्यांना आरक्षण दिले नाही. धनगर समाजाची त्यांनी फसवणूक केली. मराठा समाजाचीही दिशाभूल केल्याने त्यांचे आरक्षण रद्द झाले. ओबीसींच्या आरक्षणासाठी आवश्यक असणारी आकडेवारी ही केंद्राकडे आहे. परंतु भाजप नेते त्यासाठी राज्य सरकारकडे बोट करत आहेत, असा आरोपही पटोले यांनी केला.

 

Back to top button