कोरोना विषाणुच्या नव्या स्ट्रेनचा होणार शास्त्रीय अभ्यास | पुढारी

कोरोना विषाणुच्या नव्या स्ट्रेनचा होणार शास्त्रीय अभ्यास

नागपूर, पुढारी ऑनलाईन : कोरोना विषाणुंच्या संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान घातलं होतं. ही लाट ओसरत असताना पुन्हाना कोरोना विषाणुंच्या दुसऱ्या प्रकाराचा म्हणजेच डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढत असताना दिसत आहे. डेल्टा प्लस आतापर्यंत ७ जिल्ह्यांत प्रवेश करून २१ रुग्णांना बाधित केलेले आहे. तसेच एकाचा मृत्यूदेखील झाला आहे.

वाचा ः देशात मॉर्डना लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

कोरोना संक्रमणांच्या विविध लाटांनी देशाची अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्थेचं चक्र गतिमंद केलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात मृत्यूंच्या आकड्यांमध्ये रेकाॅर्ड केला. ही दुसरी लाट ओसरत आहे आणि बाधितांचा आकडाही कमी होत असताना डेल्टा प्लस आपलं डोकं वर काढलेलं आहे. असं सांगितलं जात आहे की, डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. 

वाचा ः ‘राष्ट्रवादी’ला विश्‍वासात घेऊन निर्णय घ्या : पवार

या व्हेरिएंटमुळे राज्यातल्या विविध भागात कोरोना विषाणुंमध्ये म्युटेशन झाल्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. याला आयसीएमआरनेदेखील दुजोरा दिलेला आहे. याच नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील स्ट्रेनचा अभ्यास करण्यात येणार आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय आणि रुग्णालयं याचा अभ्यास करणार आहेत. या अभ्यासाठी ७ दिवसांत १०० नमुने गोळा करण्यात आले असून पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आलेले आहेत. 

वाचा ः घरोघरी जाऊन लसीकरणासाठी केंद्राच्या परवानगीची गरज काय?

पुण्यातील या प्रयोगशाळेतील अभ्यासक या नव्या स्ट्रेनच्या जुनकिय साखळीवर अभ्यास करून अहवाल देणार आहेत. हा अहवाल येण्यासाठी अजून ५-७ दिवस लागण्याची शक्यता आहे. या जनुकीय साखळीतून काय निष्कर्ष निघणार, याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलेलं आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या अभ्यासासाठी व्हाॅयराॅजिच्या प्रयोगशाळेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नमुने पाठविण्यात आले आहेत. 

Back to top button