सांगली जिल्ह्याचा कोरोना आकडा हजारवर स्थिर | पुढारी

सांगली जिल्ह्याचा कोरोना आकडा हजारवर स्थिर

सांगली : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा दररोजचा आकडा एक हजारच्या आसपास स्थिर आहे. गुरुवारी कोरोना 1046  रुग्ण सापडले. 18 जणांचे बळी गेले. 991 जण गंभीर आहेत. 878 जण कोव्हिडमुक्त झाले. म्युकर मायकोसिसचे दोन रुग्ण आढळले. 

जिल्ह्यात आजअखेर  एकूण    पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 1 लाख 53  हजार 798  झाली    आहे.  सध्या  9  हजार 866 व्यक्ती उपचाराखाली आहेत.  आज  आरटीपीसीआरच्या   3286 तपासण्या करण्यात आल्या. यातील 322 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर 9362 जणांच्या अँटिजेन टेस्ट केल्या. यात 744 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. 

आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती तालुकानिहाय :  आटपाडी : 45, कडेगाव : 110, खानापूर : 77 , पलूस : 78,  तासगाव : 74 , जत : 60, कवठेमहांकाळ : 41, मिरज : 74,  शिराळा :50, वाळवा :263, सांगली शहर : 174, मिरज : 44.  

तसेच   कोल्हापूर जिल्ह्यातील 4, सातारा जिल्ह्यातील 5, सोलापूर जिल्ह्यातील 3, कर्नाटकमधील 7, मुंबईतील 1 अशा 20  पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.  होम आयसोलेशनमध्ये 8241 व्यक्ती आहेत. म्युकर मायकोसिसचा आज एक रुग्ण सापडला. या आजाराचे जिल्ह्यात एकूण 305  रुग्ण झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा आकडा कमी होत चालला आहे.  आज सांगली जिल्ह्यातील 17  जणांचे बळी गेले. खानापूर तालुक्यात 1, तासगाव  तालुक्यात 1, जत तालुक्यात 2, कवठेमहांकाळ तालुक्यात 3,   मिरज तालुक्यातील 1,    शिराळा तालुक्यात 2,   वाळवा तालुक्यात 3, सांगली शहरात 4   अशा  17  व्यक्तींचा मृत्यू झाला. कर्नाटकमधील एकाचा बळी गेला आहे.

आजअखेर तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह

आटपाडी: 9147  जत : 11920  कडेगाव : 10932 कवठेमहांकाळ : 8072  खानापूर : 11928  मिरज : 16604 पलूस : 8520  शिराळा : 9111  तासगाव : 11689 वाळवा : 22316  महापालिका क्षेत्र : 33,559 

Back to top button