सांगली जिल्ह्यात कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण : १४ बळी | पुढारी

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे ९९५ नवे रुग्ण : १४ बळी

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे  995 रुग्ण सापडले आहेत. 1 हजार 82  जण कोविडमुक्त झाले.  दिवसभरात कोरोनाने 14 जणांचा बळी घेतला आहे. 1 हजार 30 जण गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. म्युकरमायकोसीसची जिल्ह्यात 7 जणांना बाधा झाली आहे.  

जिल्ह्यात आजअखेर   पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 1 लाख 52 हजार 752  झाली  आहे.  सध्या  9  हजार 715 व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.  आज दिवसभरात आरटीपीसीआरच्या   2962 तपासण्या करण्यात आल्या. यातील 250 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर 9944 जणांच्या अ‍ॅन्टिजन टेस्ट केल्या. त्यात 758 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती तालुकानिहाय  अशा:  आटपाडी : 49, कडेगाव : 70, खानापूर : 48, पलूस : 87, तासगाव : 110, जत : 23, कवठेमहांकाळ : 59, मिरज :88, शिराळा : 50, वाळवा :234, सांगली शहर : 146, मिरज : 31.  

सांगलीसह इतर जिल्ह्यातील  14 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.   खानापूर  3, पलूस  1, मिरज  2, शिराळा  1 आणि वाळवा तालुक्यातील 2 अशा  9   व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात 2 जणांचा तर   कोल्हापूर जिल्ह्यातील 3 जणांचा  आज सांगलीत   उपचारादरम्यान मृत्यू झाला.   तसेच म्युकरमायकोसीसने  एकाचा मृत्यू झाला आहे. 

कोल्हापूर 4 , सोलापूर 4,  सातारा 1 आणि पुणे जिल्ह्यातून 1  आणि कर्नाटकातून आलेल्या 3 अशा  13 पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचार सुरू आहेत.  होम आयसोलेशनमध्ये   8045 व्यक्ती आहेत.

आजअखेर तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह

 आटपाडी: 9102  जत : 11860  कडेगाव :10822

 कवठेमहांकाळ : 8031  खानापूर : 11851  मिरज : 16530

  पलूस : 8442 

   शिराळा : 9061  तासगाव : 11615

 वाळवा : 22053  महापालिका क्षेत्र : 33,385

Back to top button