माऊलींच्या पादुकांना निरेत शाही स्नान नाही; दत्तघाट पडला ओस | पुढारी

माऊलींच्या पादुकांना निरेत शाही स्नान नाही; दत्तघाट पडला ओस

निरा; पुढारी वृत्तसेवा : ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना दर वर्षी निरा नदीकिनारी स्नान घालण्यात येते. टाळ मृदूंगाचा गजर, पताका घेतलेला वैष्णवांचा मेळा आणि मुखी विठ्ठल नामाचा जयघोष करीत, “,अवघा रंग एक जाहला” ची अनुभूती देत चैतन्यमय वातावरणात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत खळखळून वाहणा-या निरा नदीतील पाण्याने श्री. संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात येते. 

सातारच्या भामट्याने अमेरिकेचा गुप्तचर अधिकारी असल्याचे सांगून पुण्याच्या तरुणीला घातला गंडा! 

मात्र शासनाने कोरोनाच्या संकटामुळे पायी वारीवर निर्बंध आणल्याने गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही माऊलींच्या पादुकांना निरा नदीवरील दत्तघाटावर शाही स्नान घालण्यात न आल्याने दत्तघाट ओस पडलेला दिसत होता. निरा स्नानानंतर माऊलींच्या पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत असतो. वारीची परंपरा सुरू करणा-या  हैबतबाबांच्या जन्मभुमित यंदाही कोरोनाच्या निर्बंधामुळे माऊलींच्या पालखी सोहळ्याचे स्वागत झाले नाही.

निरा व परिसरातील नागरिक माऊलींच्या पालखी सोहळ्यात पायी चालणा-या दिंड्यातील वारक-यांना अन्नदान करण्यासाठी अतुर झालेले असतात.

निरा बाजारपेठेतील व्यापारी,  तसेच विविध सामाजिक  संस्था, संघटना वारक-यांच्या आंघोळीची, कपडे धुण्याची, चहा- नाष्टयाची  तसेच जेवणाची सोय करण्यात तल्लीन झालेले असतात. निरा ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी सोहळ्यातील वारक-यांना कोणत्याही सोई – सुविधांची  अडचण भासू नये याकरिता पालखी सोहळा  गावात येण्याच्या अगोदर स्वच्छता, साफ- सफाई व पाणी पुरवठ्याची सोय करण्यात येत असते.  त्यामुळे पालखी सोहळा आळंदीतून निघाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील शेवटचे गांव असलेल्या निरा गावात येईपर्यंत नागरिक, व्यापारी , ग्रामपंचायत प्रशासन यांची होणारी धावपळ तसेच  शासकीय वरिष्ठ अधिका-यांची सोई सुविधा पाहण्यासाठी होणा-या भेटी यामुळे प्रसन्न वातावरण तयार होत असते. त्यामुळे तरूणांचाही उत्साह वाढलेला दिसून येतो.

भीमा कोरेगाव प्रकरण : चौकशी आयोगासमोर शरद पवार साक्ष नोंदवणार

   

जेष्ठ अमावस्येला वाल्हे येथील मुक्काम आटोपून माऊलींचा पालखी सोहळा पिंपरे खुर्द येथे सकाळची न्याहरी घेऊन दुपारचा नैवद्य व विसाव्यासाठी निरा गावात आकरा वाजण्याच्या सुमारास प्रवेश करीत असतो. 

निरा येथील शिवाजी चौकात  सरपंच, उपसरपंचांसह प्रतिष्ठित नागरिक, महसुल प्रशासनातील अधिकारी तसेच निरेकर नागरिक मोठ्या भक्तीमय वातारणात माऊलींचे स्वागत करीत असतात. त्यानंतर पालखी दुपारच्या विसाव्याकरिता ‘निरा नदी काठावरील पालखी तळावर विसावत असते. परिसरातील हजारो भाविक माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी करीत असतात.

तिथीनुसार यंदा माऊलींचा सोहळा शुक्रवारी (दि.९) निरा येथील निरा नदीकाठी दुपारच्या नैवद्याकरिता विसावला असता. 

या दरम्यान निरा येथील पालखी तळावर आळंदी देवसंस्थानच्या विश्वस्तांसह सोहळा प्रमुखांबरोबर पुणे व सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी,  प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलिस अधिक्षक, डी.वाय.एस.पी, पोलिस निरीक्षक, जि.प.चे पदाधिकारी उपस्थित राहून आळंदी ते निरा पर्यंतच्या प्रवासातील अडीअडचणींवर चर्चा करीत असतात. हा प्रसंगही पहाण्यासारखा असतो.

     

श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये इंद्रायणी, निरा, चंद्रभागा तीरावरील स्नानाला अधिक महत्व आहे. सुरूवातीला माऊलींच्या पादुकांना इंंद्रायनीच्या पवित्र  तीर्थाने स्नान घालण्यात येेेत असते. त्यानंतर संपुर्ण सोहळ्याच्या वाटचालीत निरा येथे नदीच्या तीर्थात श्री.दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना पहिले शाही स्नान घालण्याची परंपरा आहे.त्यानंतर सोहऴ्याचा प्रवासाचा अर्धा टप्पा पुर्ण होत असतो.


            निरा भिवरा पडता दृष्टी |

               स्नान करिता शुद्धी सृष्टी ||

               अंती तो वैकुंठ प्राप्ती|

               ऐसे परमेहि बोलले ||

दुपारचा नैवद्य झाल्यानंतर दुपारी दीड वाजता हा सोहळा ” पादुकांना” निरा स्नानासाठी मार्गस्थ  होत असतो.

निरा नदीवरील जुन्या ब्रिटिशकालीन  पुलावरून माऊलींचा रथ दत्तमंदीरासमोर आल्यानंतर माऊलींच्या पादुकांना रथामधून बाहेर घेऊन सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर  यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतात.

यावेळी पालखी सोहळयाचे सोहळा प्रमुख, आळंदी संस्थानचे विश्वस्त, पालखी सोहळा मालक  चोपदार  आदींच्या उपस्थितीत खळखळणारी निरा नदी, वाहणारा थंडगार वारा…मनसोक्त डुबणारे वारकरी आणि माऊलीं…..माऊलीच्या जयघोषात व टाळमृदुंगाच्या गजरात माऊलींच्या पादुकांना दत्तघाटावर भक्तिमय वातावरणात शाही स्नान घालण्यात येत असते.

यानंतर पालखी सोहळा सातारा जिल्हयात प्रवेश करीत असतो परंतू शासनाने कोरोनाच्या संकटामुळे पायी वारीवर निर्बंध आणल्याने सर्वञ सन्नाटा दिसत होता.

निरा येथे माऊलींचा सोहळा येण्यापुर्वी निरा  व परिसरातील घरांघरांत माऊलींचे दर्शन घेण्यासाठी पाहुणे येत असतात तसेच घरांघरांत आनंदाचे वातावरण निर्माण होत असते . त्यामुळे यंदाही पायीवारी नसल्यामुळे प्रत्येक घरांत सुने सुने लागत होते.

दरम्यान, माऊलींचे स्नान दुपारी दीड वाजता होत असते त्यावेळेस यंदा वरूणराजाने जोरदार हजेरी लावली होती.

यंदा माऊलींचे आळंदीतच झाले  ‘निरा स्नान’

कोरोनाच्या संकटामुळे पायी वारी रद्द झाल्याने गत वर्षी माऊलींना निरा स्नान घातले गेले नाही. परंतू यावर्षी आळंदी संस्थानच्या विश्वस्तांनी गुरूवारी (दि.८) रोजी माऊलींना निरा नदीत ज्या ठिकाणी स्नान घातले जाते तेथील पविञ तीर्थ जलकुंडात नेऊन शुक्रवारी (दि.९) सकाळी साडे सहा वाजता अभिषेकावेळी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख अँड.विकास ढगे पाटील यांनी सांगितले.

निरा दत्तघाट पडला होता ओस…..

प्रथेनुसार जेष्ठ अमावस्येला माऊलींच्या पादुकांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास निरा नदीच्या दत्तघाटावर ‘निरा स्नान’  घालण्याची प्रथा आहे. परंतू कोरोनाच्या संकटामुळे गत वर्षापासून पायी वारी रद्द झाल्याने दरवर्षी लाखो वैष्णवांच्या उपस्थित माऊलींना घालण्यात येणारे निरा स्नान यावर्षीही निरा नदीच्या प्रसिद्व दत्तघाटावर न झाल्याने वारक-यांविना दत्तघाट ओस पडलेला दिसत होता.

Back to top button