Fri, Sep 25, 2020 19:12होमपेज › Vishwasanchar › दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहिण्याचा विक्रम

दोन्ही हातांनी एकाच वेळी लिहिण्याचा विक्रम

Last Updated: Sep 15 2020 8:47PM
बंगळूर : ‘व्हायरस’ आठवतोय? हल्‍ली ‘व्हायरस’ म्हटलं की ‘कोरोना व्हायरस’च डोळ्यांसमोर येतो आणि त्याला पर्याय नाही! मात्र राजकुमार हिरानी यांचा ‘थ—ी इडियटस्’ आला त्यावेळी वेगळा ‘व्हायरस’ चर्चेत होता. हा ‘व्हायरस’ म्हणजे ‘वीरू सहस्त्रबुद्धे’. बोमन इराणी यांनी केलेली ही प्रिन्सिपलची भूमिका प्रचंड गाजली. त्यामध्ये हा अफलातून बुद्धिमान असलेला माणूस एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहित असलेला दाखवला आहे. एका मुलीने आता असेच कौशल्य दाखवून एक नवा विक्रम घडवला आहे. 

कर्नाटकातील मंगळुरूमधील आदिस्वरूपा नावाच्या मुलीने हा विक्रम केला आहे. अवघ्या सोळा वर्षांच्या या मुलीने एका मिनिटात दोन्ही हातांनी एकाच वेळी सर्वाधिक शब्द लिहिण्याचा विक्रम केला आहे. आदिच्या या विक्रमाची नोंद ‘एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. याबाबतचे प्रमाणपत्रही तिला देण्यात आले आहे. तिने सांगितले, मी एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिताना एका मिनिटात 40 शब्द लिहिले व हा विक्रम झाला. हे कौशल्य मिळवण्यासाठी मी बरीच मेहनत घेतली होती. मी आता एका मिनिटात दोन्ही हातांनी एकाच वेळी 50 शब्दही लिहू शकते, असा मला विश्‍वास आहे.  

 "