Mon, Sep 28, 2020 07:27होमपेज › Vishwasanchar › स्पायडरमॅनप्रमाणे मनगटातून सॅनिटायझर सोडणारे उपकरण!

स्पायडरमॅनप्रमाणे मनगटातून सॅनिटायझर सोडणारे उपकरण!

Last Updated: May 21 2020 10:13PM
न्यूयॉर्क :

प्रत्येक गोष्टीत काही तरी आकर्षक, नावीन्य शोधण्याची माणसाला सवयच असते. आताही कोरोना काळात सॅनिटायझर ही एक आवश्यक बाब बनली असताना त्यामध्येही ‘हटके’ प्रकार केले जात आहेत. आता चक्क मनगटावरून हाताच्या पंजावर सॅनिटायझर फवारण्याचे उपकरण बनवण्यात आले आहे. स्पायडरमॅन जसे मनगटातून जाळे फेकतो तशाच पद्धतीने हे उपकरण काम करते!

अमेरिकेतील ‘पम्पिक्स’ या कंपनीने हा ‘रिस्ट बँड सॅनिटायझर स्प्रे’ बाजारात आणला आहे. हे वेअरेबल म्हणजेच शरीरावर परिधान करता येणारे उपकरण सध्याच्या कोरोना काळात सहायक आहे. या उपकरणामुळे सॅनिटायझर सहजपणे आपल्यासमवेत नेता येऊ शकते तसेच ते तितक्याच सहजपणे वापरताही येऊ शकते. हा स्प्रे कसा वापरावा आणि त्याचा कसा फायदा आहे यासंदर्भात कंपनीने एक जाहिरात यू ट्यूबवर पोस्ट केली आहे.

 "