Wed, Oct 28, 2020 11:22होमपेज › Vishwasanchar › जपानी लोकांना हॅलोवीनचे वेध

जपानी लोकांना हॅलोवीनचे वेध

Last Updated: Oct 19 2020 1:20AM
पाश्‍चात्त्य देशांत दरवर्षी 31 ऑक्टोबरला ‘हॅलोवीन’ साजरा केला जातो. काहींचे म्हणणे आहे, या दिवसानंतर ऋतू बदलतो. म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे, तर काही जणांनी या दिवसाला संस्कृतीची जोड देऊन हा काळ मृत लोकांची प्रार्थना करण्यासाठी योग्य आहे, असे नमूद केले. अगदी 18 व्या शतकापासून या हॅलोवीनचे उल्लेख आढळतात. परंतु जसजशी वर्षे लोटली तसतसे हॅलोवीनचे स्वरूपही बदलले. काही देशांत हॅलोवीनची परंपरा नसतानाही पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करत हा सण साजरा करताना दिसत आहे. त्यातलाच एक देश आहे जपान.

साधारण 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2000 साली टोकिओ डिस्नेलँडने हॅलोवीनचा कार्यक्रम सुरू केला. त्यांनी ही संकल्पना जगभरातील डिस्नेलँडस्कडून घेतली. जास्तीत जास्त लोकांनी या काळात थीम पार्कला भेट द्यावी, हा त्यांचा उद्देश. 

जपानमधील अन्य थीम पार्क्सनीसुद्धा टोकिओ डिस्नेलँडच्या पावलावर पाऊल ठेवत ऑक्टोबर हा हॅलोविनचा महिना असतो, याची ओळख लोकांना करून दिली आणि  दरवर्षी याची लोकप्रियता वाढत गेली. जपानमध्ये तर ऑगस्टपासूनच हॅलोवीनच्या वस्तूंनी बाजारपेठ फुलू लागते. यात मुख्यतः हॅलोवीनची कव्हर असणारी चॉकलेटस्, कॅडबर्‍या आणि वेगवेगळे ड्रेस असतात. हॅलोवीनच्या दिवशी कॉस्च्युम परेडस् निघतात. कॉस्च्युम परेडस् म्हणजे रस्त्यावरून निघणार्‍या मिरवणुका. रस्त्याच्या मधून विविध वेशभूषा, केशभूषा आणि मेकअप केलेले उत्साही कलाकार आणि रस्त्याच्या दुतर्फा त्यांना बघायला जमलेली बघ्यांची गर्दी पाहायला मिळते.

- पूजा कुलकर्णी, केणी

 "