Thu, Oct 29, 2020 07:54होमपेज › Vishwasanchar › कोरोना काळात मानसिक आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे

कोरोना काळात मानसिक आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे

Last Updated: Oct 18 2020 1:14AM
जेरूसलेम :

‘कोरोना’ हा केवळ प्राणावर बेतणाराच आजार नसून तो माणसाच्या झोप आणि मानसिक आरोग्यावरही घाला घालत आहे, असा निष्कर्ष नुकत्याच करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे.

‘स्लिप’ नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनातील माहितीनुसार कोरोना ही महामारी माणसाच्या झोपेबरोबरच मानसिक आरोग्यावरही परिणाम करत आहे. थोडक्यात काय कोरोनामधून बरे झाल्यानंतरही कमी-अधिक प्रमाणात या आजाराचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय या आजाराचा जनजीवनावरही परिणाम होत आहे. या घातक विषाणूच्या चिंतेत अनेक माता या झोप कमी येणे आणि एंग्झाइटीच्या विळख्यात सापडत आहेत. 

इस्रायलमधील बेन-गुरियन युनिव्हर्सिटीचे संशोधक लिएट टिकोत्जकी यांनी सांगितले की, कोरोना महामारीचे दुष्परिणाम सध्या दिसून येत आहेत. मातांमध्ये एंग्झाइटी आणि झोप कमी येण्याबरोबरच लहान मुलांमध्येही झोपेचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. या महामारी काळात झोप कमी येण्याच्या समस्या दुप्पट म्हणजे 23 टक्क्यांवर पोहोचली आहे. कोरोना येण्यापूर्वी या समस्येचे प्रमाण 11 टक्के होते.

संशोधनात सहभागी झालेल्या इस्रायली महिलांना कोरोना महामारीपूर्वीच्या त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल प्रश्‍न विचारण्यात आले. याशिवाय लॉकडाऊन काळात घरात बंद झाल्याबद्दलही प्रश्‍न करण्यात आले. दोन्ही स्थितींचा अभ्यास करून वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे.

 "