Mon, Aug 10, 2020 20:45होमपेज › Vidarbha › अकोला : जिल्हा उपनिबंधक आणि सहायक विक्रीकर आयुक्त लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

अकोला : जिल्हा उपनिबंधक आणि सहायक विक्रीकर आयुक्त लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

Last Updated: Jul 09 2020 5:54PM

संग्रहित छायाचित्रबुलडाणा : पुढारी वृत्तसेवा

दोन लाख रूपयांची लाच घेतल्या प्रकरणात अकोला जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था ) प्रविण लोखंडे व सहायक विक्रीकर आयुक्त अमर शेट्टी हे दोघे अधिकारी गुरूवारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. या कारवाईने अकोल्यात खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा : हरवलेलं लेकरु सापडलं अन् तिनं फोडला हंबरडा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व एरिएस प्रस्तावास मान्यता देण्याकरीता लोखंडे व शेट्टी या दोघा अधिकाऱ्यांनी पाच लाख रूपये लाचेची मागणी केली. त्यापैकी दोन लाखाची रक्कम घेऊन तक्रारदार हा अमर शेट्टी यांच्या निवासस्थानी गेला. त्यावेळी तेथे एसीबीने लावलेल्या सापळ्यात दोन्ही अधिकारी लाच घेताना अडकले. जिल्हा उपनिबंधक प्रविण लोखंडे व सहायक विक्रीकर आयुक्त अमर शेट्टी या दोन्ही आरोपींना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. अकोला एसीबीचे उपअधीक्षक एस.एस.मेमाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिक वाचा : अकोल्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त