Sat, Aug 08, 2020 10:58होमपेज › Vidarbha › पेट्रोल न दिल्याने पंपावर सोडले तीन विषारी साप!

पेट्रोल न दिल्याने पंपावर सोडले तीन विषारी साप!

Last Updated: Jul 13 2020 9:42PM
बुलडाणा : पुढारी वृत्तसेवा

प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पेट्रोल दिले नाही म्हणून दोघा युवकांनी पेट्रोलपंप मालकाच्या केबीनमध्ये 3 विषारी साप आणून सोडल्याची खळबळजनक घटना आज सोमवारी दुपारी 4 वाजता मलकापूर रोडवरील चौधरी पेट्रोलपंपावर घडली. हा सर्व प्रकार पंपावरील सीसीटीव्हीत चित्रित झाला आहे.

अधिक वाचा : भाजप आमदाराच्या अपशब्दामुळे नागपुरात मनपात कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

पेट्रोलपंप चालक सारीका चौधरी यांनी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दिली आहे. दुपारी चारच्या सुमारास दोन अज्ञात युवक पंपावर येऊन प्लास्टिक बाटलीत पेट्रोल मागू लागले. लाॅकडाऊनमुळे यावेळी पेट्रोल देता येणार नाही असे सांगितल्याने धमकी देत ते निघून गेले. त्यांनी 15 मिनिटानी परत येऊन सोबत आणलेले 3 विषारी साप पंप मालकाच्या केबीनमध्ये सोडून दिले. या प्रकाराने घाबरलेल्या चौधरी यांनी तत्काळ शहरातील एका सर्पमित्राला बोलावून हे तीनही साप पकडले. यामध्ये 2 कोब्रा व 1 धामण जातीचा साप होता. बुलडाणा पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

अधिक वाचा : नवरा गर्लफ्रेंडसह 'रेंज रोव्हर'मधून जात असताना बायकोने ओव्हरटेक करुन भर रस्त्यातच...! (video)

अधिक वाचा : कोरोना विषाणूची परीक्षा पडली महागात, गेला हकनाक बळी