Wed, Aug 12, 2020 00:18होमपेज › Vidarbha › महिला पोलिस पती असल्याचे सांगून थेट प्रियकरासोबत क्वारंटाईन, त्यानंतर त्याच्या पत्नीने..

महिला पोलिस पती असल्याचे सांगून थेट प्रियकरासोबत क्वारंटाईन, त्यानंतर त्याच्या पत्नीने..

Last Updated: Jul 17 2020 7:28AM

संग्रहित छायाचित्रनागपूर : पुढारी ऑनलाईन

नागपूरच्या सुरेंद्रनगर भागातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका महिला पोलिसांनं पती सांगून दुसऱ्याच पुरुषाला आपल्या सोबत क्वारंटाईन केल्याने खळबळ उडाली आहे. या महिला पोलिसाचा कारनामा संबंधित पुरुषाच्या पत्नीने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केल्यानंतर उघडकीस आला.  

अधिक मिळालेल्या माहितीनुसार नागपूर पोलिस दलातील एका पोलिसाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर नियमाप्रमाणे त्या पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना पोलिस प्रशिक्षण दलातील सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. यावेळी त्या ठाण्यातील महिला पोलिसाने एका पुरुषाला सोबत आणले. हा आपला पती असून आपल्या सातत्याने संपर्कात असल्याने त्यालाही क्वारंटाईन करावे, असा दावा केला. 

महिलेसोबत आलेला हा पुरुष तिचा पती असल्याची कुठलीही खात्री न करता नियमाप्रमाणे त्यांना चक्क एक स्वतंत्र रुम देण्यात आली. काही दिवस या दोघांनी या रुममध्ये आनंदाने घालवले, मात्र संबंधित पतीच्या पत्नीने बजाजनगर पोलीस ठाणे गाठून आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आणि हा प्रकार उजेडात आला.

तक्रारदार महिलेनेच यासंदर्भात भांडाफोड केला. क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला पोलिसासोबत राहत असलेला व्यक्ती आपला पती असल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. तिच्या या तक्रारीनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली. 

वरिष्ठांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेत त्या दोघांना वेगळे केले. पोलिसांसह महापालिका आणि आरोग्य विभागानं या प्रकाराबद्दल मौन बाळगलं आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्या नुतन रेवतकर यांनी मात्र या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.