Sun, Aug 09, 2020 14:43होमपेज › Vidarbha › बुलडाणा जिल्ह्यात पडली सात रुग्णांची भर

बुलडाणा जिल्ह्यात पडली सात रुग्णांची भर

Last Updated: Jul 02 2020 7:39PM

प्रातिनिधीक फोटोबुलडाणा : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात आज गुरूवारी आणखीन ७ पॉझिटिव्ह कोरोना रूग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता २६०  झाला आहे. एकीकडे कोरोनाने जिल्ह्यात हाहाकार करत रूग्णसंख्या २६० गेली असतानाच १५४ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने आरोग्य यंत्रणेवरचा काहीसा ताण कमी झाला आहे. २६० पैकी १५४ रूग्णांची प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना यापूर्वीच रूग्णालयातून सुटी देण्यात आली  आहे. तर कोरोनाने आजपर्यंत १२ रूग्ण मृत झाले असून ९४ रूग्ण कोविड रूग्णालयात उपचार घेत आहेत.

बुलडाण्यात १८ नव्या रूग्णांची भर

सध्या २९३ कोरोना संशयितांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.