वाशीम : अजय ढवळे
पोहरादेवी येथील गर्दी प्रकरणी वाशीम पोलिसांनी निष्पन्न झालेल्या १० जणांसह ८ ते १० हजार लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : मंत्री राठोडांच्या शक्तीप्रदर्शनात नियमांचा उडाला फज्जा
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड सुमारे १५ दिवसांनंतर समोर येत आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दाखल झाले. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. संजय राठोड यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे १० हजार लोक याठिकाणी जमले होते. मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या पाश्र्वाभूमीवर कालच गर्दी न करण्याचे व कुठलाही कार्यक्रम न घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत पोहरादेवी येथे नियमांना तिलांजली दिली. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमारही करण्यात आला.
पश्चिम विदर्भातील करोनाचा कहर लक्षात घेता पोहरादेवीतील गर्दीमुळे आणखी करोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी विरोधकांकडूनही टीका करण्यात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी वाशीम पोलिसांनी निष्पन्न झालेल्या १० जणांसह याठिकाणी उपस्थित असलेल्या ८ ते १० हजार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत कारवाई सुरू होती.
पोहरादेवी येथे पोलिसांचा लाठीचार्ज
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अखेर संजय राठोडांनी सोडले मौन, म्हणाले...
पोहरादेवी येथे लोकांनी गर्दी केली होती. या प्रकरणी नावे निष्पन्न झालेल्या १० जणांसह ८ ते १० हजार लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- वसंत परदेशी, जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशीम.