Fri, Sep 25, 2020 17:43होमपेज › Vidarbha › गडचिरोलीत नक्षलवादी हल्ला, एक जवान शहीद

गडचिरोलीत नक्षलवादी हल्ला, एक जवान शहीद

Last Updated: Aug 14 2020 2:32PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

किराणा दुकानातून सामान आणायला गेलेल्या पोलिस दलातील दोन जवानांवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोठी या गावात शुक्रवारी ( दि. १४) सकाळीच ही घटना घडली आहे. 

अधिक वाचा :विदर्भातील गोसीखुर्द, अप्पर वर्धा धरणातून सोडले पाणी (video)

भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस मदत केंद्रातील जवानांवर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. कोठी पोलिस मदत केंद्रातील जवानांवर केलेल्या या हल्ल्यात दुशांत नंदेश्वर यांना वीरमरण आले, तर दिनेश भोसले हे जखमी झाले आहेत. दोन्ही जवान कोठी गावात किराणा आणण्यासाठी गेले होते. याच दरम्यान गावात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दोन्ही जवानांवर हल्ला केला. या हल्ल्यात जवान दुशांत नंदेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस मुख्यालयातून घटनास्थळाकडे हेलिकॉप्टर रवाना करून जखमी असलेल्या दिनेश भोसले या जवानाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले.

अधिक वाचा : फाशीच्या निकालानंतर पोलिस ठाण्यावर विद्यूत रोषणाई

 "