Sun, Aug 09, 2020 13:05होमपेज › Vidarbha › अकोला जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १७०० पार

अकोला जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १७०० पार

Last Updated: Jul 05 2020 12:12PM
नागपूर : पुढारी वृत्तसेवा 

अकोला जिल्ह्यात रविवारी (दि. ५) सकाळी आलेल्या अहवालात ३८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अकोल्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता १ हजार ७०३ एवढी झाली आहे. 

रविवारी सकाळी कोरोना संसर्ग तपासणीचे ११९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील  ८१ अहवाल निगेटीव्ह तर ३८ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या १७०३ वर पोहचली आहे. यातील १ हजार २५५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ३५९ क्रियाशील रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ८९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आज सकाळच्या अहवालात ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ११ महिला व २७ पुरुष आहेत. त्यातील आठ जण पक्की खोली येथील, सात जण आदर्श कॉलनी, सात जण अकोट, पाच जण चांदुर, दोन जण बार्शी टाकळी, दोन जण कच्ची खोली येथील आहेत. तसेच राधाकिसन प्लॉट, जुने शहर, वाडेगाव, पातुर, साईनगर, महान आणि नानक नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 

दरम्यान, काल (दि. ४) रात्री एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ८२ वर्षीय पुरुष असून त्यांना गुरुवारी (दि. २) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा शनिवारी मृत्यू झाला.