Thu, Oct 01, 2020 17:41होमपेज › Vidarbha › शिवबंधन सुटून राजीनामा खिशातून बाहेर; सेना आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी 

शिवबंधन सुटून राजीनामा खिशातून बाहेर; सेना आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी 

Published On: Mar 20 2019 7:45PM | Last Updated: Mar 29 2019 1:40AM
चंद्रपुर : पुढारी ऑनलाईन

शिवसेना आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेना आणि भाजपची युती झाल्याने  धानोरकरांनी राजीनामास्त्र उपसले. भारतीय जनता पक्षाकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्यांनी आरोप केला आहे. धानोरकर काँग्रेसमधील प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे. 

युती अस्तित्वात आल्यानंतर धानोरकरांनी मंत्र्यांवर टीकेचे बाण अधिक उग्र केले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावती विधानसभा मतदारसंघातून सुरेश नारायण उर्फ बाळू धानोरकर आमदार आहेत.  त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. 

काँग्रेसचे स्थानिक नेते चंद्रपूर लोकसभा निवडणूकीची उमेदवारी मिळावी म्हणून दिल्लीत प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांना यश आले नाही. काँग्रेसची मिळो अथवा नाही. निवडणूक लढण्याची आपली पूर्ण तयारी झालेली आहे. शिवसेनेकडून ते शक्य नाही म्हणून आपण आमदारकी व शिवसेना पदाचा राजीनामा दिल्याचेही त्यांनी सांगितले.