वाशिम : पुढारी वृत्तसेवा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप झालेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज ( दि. २३ ) पोहरादेवी पोहचले. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांनी अनेक दिवसांनी आपले मौन सोडत सर्व आरोप फेटाळले. त्यानंतर ते पोहरादेवीच्या दर्शनासाठी सपत्नीक रवाना झाले. दरम्यान, राठोड यांचे अनेक समर्थक पोहरादेवी येथे जमले. या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू आहेत तरीही खूप मोठ्या प्रमाणात लोक येथे जमल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.