Wed, Aug 05, 2020 19:05होमपेज › Vidarbha › वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

Last Updated: Jul 17 2020 7:28AM
वाशिम : पुढारी वृत्तसेवा

वाशिम शहरासह जिल्ह्यातील विविध भागात आज (दि. १६ रोजी) पावसाने दमदार हजेरी लावली. आज दुपारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. 

अमरावतीमधील जुन्या मार्केटची इमारत कोसळली

दरम्यान शेलुबाजार चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हे पाणी चौकातील पोलिस चौकी, बुलढाणा बँकसह काही दुकानामध्ये घुसल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. शेलुबाजार चौकातूनच औरंगाबाद-नागपूर, अकोला-दिग्रस मार्ग जातो. येथे मागील काही दिवसांपासून मार्गाचे काम सुरू असून ते अर्धवट झाले आहे. या अर्धवट कामामुळे रस्त्यात पाणी साचल्याने वाहधारकासह दुकानदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर शेलुबाजार नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे औरंगाबाद-नागपूर मार्ग अर्धा तासापासून बंद आहे. यामुळे वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.