Sun, Sep 20, 2020 09:24होमपेज › Vidarbha › अकोला जिल्ह्यात उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी

अकोला जिल्ह्यात उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी

Last Updated: May 27 2020 4:16PM

संग्रहित छायाचित्रबुलडाणा : पुढारी वृत्तसेवा

मागील दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. दरम्यान, आज (ता.२७) तापमानाने उच्चांक गाठला. येथील तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले. उष्म्याने राज्यात पहिला बळी अकोला जिल्ह्यात घेतला असे सांगण्यात येत आहे. 

मोरगांव (सादीजन, ता. बाळापूर) येथील किसन किनेकर (वय 40) यांना तळपत्या उन्हाचा फटका बसल्याने अकोला येथील शासकीय सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज बुधवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हा उष्माघाताचा राज्यातील पहिला बळी असावा असे समजले जात आहे.

 "