Mon, Apr 12, 2021 03:50
बुलडाण्यात कोरोनाचा आकडा वाढला, दोन दिवसांची संचारबंदी

Last Updated: Feb 26 2021 4:58PM

बुलडाणा :  पुढारी वृत्तसेवा 

बुलडाण्यात कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी वाढतांना दिसत आहे. आज शुक्रवार (दि.२६) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात ३९१ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. गेल्या दहा दिवसात एकूण २ हजार ९५३ कोरोनाबाधित आढळले आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण १७,९७९ कोरोनाबाधित रूग्ण आढळले. त्यातून १५,२५८ रूग्ण कोरोनामुक्त झाले .तर १९२ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह करण्याचे रॅकेट!

जिल्ह्यातील कोरोना प्रादूर्भाव पाहता जिल्हादंडाधिकारी यांनी आज शुक्रवार दि. २६ सायं ५ वाजेपासून सोमवार दिनांक २८ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. या काळात केवळ दवाखाने आणि मेडिकल उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तर दुध विक्रेत्यांना सकाळ-सायंकाळ दोन तासांची सूट दिली आहे. या खेरिज सर्व बाजारपेठ पूर्णपणे  बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

तिनं ज्याच्यावर भरभरून प्रेम केलं; त्यानंच वडील अन् भावाला यमसदनी धाडल