Fri, Feb 26, 2021 05:57
कोरोना अपडेट : अमरावतीत नवे ९२६ कोरोना रुग्ण

Last Updated: Feb 23 2021 6:48PM

अमरावती : पुढारी वृत्तसेवा

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात  ९२६  नवे कोरोना रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या ३१ हजार १२३ झाली आहे.

जिल्ह्यात गत चोवीस तासात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या ४७१ वर पोहोचली.

१. फ्रेझरपुरा, अमरावती येथील ७३ वर्षीय महिला हीचा जिल्हा कोविड रुग्णालयात

२. आशियाड कॉलनी, अमरावती येथील ६३ वर्षीय महिलेचा ऍक्सझोन हॉस्पिटलमध्ये

३. अंजनगाव सुर्जी येथील ४४ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात

४. अंजनगाव, अमरावती येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात

५. गव्हानकुंड, ता. वरुड येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा जिल्हा कोविड रुग्णालयात

६. आर्वी येथील ६० वर्षीय महिलेचा जिल्हा कोविड रुग्णालयात