Sun, Aug 09, 2020 14:36



होमपेज › Vidarbha › वाशिम : छेड काढणाऱ्या नगरसेवकाला महिलांकडून चोप!

छेड काढणाऱ्या नगरसेवकाला महिलांकडून चोप!

Last Updated: Jul 11 2020 5:02PM




वाशिम  : पुढारी वृत्तसेवा

वाशिम जिल्ह्यातील कारंजा नगर परिषदेचे वादग्रस्त स्वीकृत नगरसेवक निसार खान नजीर खान यांच्यावर एका २७ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान या घटनेनंतर छेड काढणाऱ्या नगरसेवकाला महिलांकडून चांगला चोप देण्यात आला असल्याची माहिती आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून निसार खानवर छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ही आपल्या घरकामानिमित्त बाहेर जात असताना निसार खान हे नेहमी पाठलाग करत होते. पाठलाग का करतोस? असे म्हटल्यास तो म्हणाला की हा माझा नेहमीचा मार्ग आहे असे बोलल्यावर त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र दि.१० जुलै रोजी निसार खान यांनी मला तुझा मोबाईल नंबर दे म्हणत असभ्य वागणूक करून सदर महिलेचा विनयभंग केला.

पीडित महिलेच्या तक्रारी वरून कारंजा पोलिसांनी कलम ३५४,३५४ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सतीश पाटील यांचा मार्गदर्शनाखाली कारंजा शहर पोलीस करीत आहे.
निसार खान हे कारंजा नगर पालिकेचे स्वीकृत नगरसेवक असून नेहमी कोणत्या ना कोणत्या वादमध्ये गुंतलेले असतात. सध्या खान यांच्यावर खोटे दस्तावेज देऊन नगरसेवकपदी विराजमान झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट आहे .तसेच या गुन्ह्यासह त्यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे कारंजा शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असल्याची माहिती आहे.