Fri, Sep 25, 2020 18:50होमपेज › Vidarbha › विदर्भातील गोसीखुर्द, अप्पर वर्धा धरणातून सोडले पाणी (video)

विदर्भातील गोसीखुर्द, अप्पर वर्धा धरणातून सोडले पाणी (video)

Last Updated: Aug 14 2020 1:20PM

अप्पर वर्धा धरणातून सोडण्यात आलेले पाणीनागपूर : पुढारी वृत्तसेवा 

संततधार सुरू असलेल्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विदर्भातील सर्वात मोठ्या दोन्ही धरणाचे दरवाजे शुक्रवारी (दि. १४) उघडले. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे ३६ पैकी ३३ दरवाजे आणि अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ११ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

अधिक वाचा : फाशीच्या निकालानंतर पोलिस ठाण्यावर विद्यूत रोषणाई

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी साठवणूक प्रकल्प असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचे ११ दरवाजे ३५ सेंटीमीटरने आज पहाटे उघडण्यात आले. या धरणातून सध्या ६२० घनमीटर प्रतिसेंकद एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मागील दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यातील व मध्यप्रदेशमधील अनेक जिल्ह्यात दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहेत. यामुळे अप्पर वर्धा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गुरुवारी रात्री धरणाचा १ दरवाजा उघडण्यात आला. मात्र, मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने जलाशयाच्या पातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे आज पहाटे धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहे. सध्या अप्पर वर्धा धरण ९५ टक्के भरले आहे. नदिकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

अधिक वाचा : बुलढाण्यात आज ३८ पॉझिटिव्ह 

गोसीखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे उघडले

मध्य प्रदेशमध्येही जोरदार पाऊस झाला असल्याने भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा सुरू झाला आहे. गोसेखुर्द धरणाच्या क्षेत्रात असलेल्या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोसीखुर्द प्रकल्प स्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने धरण नियंत्रणाकरीता आज शुक्रवारी (दि ११) रोजी सकाळी ८ वाजता गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे प्रत्येकी १ मीटर ने व ६ गेट प्रत्येकी ०.५० मीटरने उघडण्यात आलेले आहे. धरणातून पाण्याचा प्रवाह सुरू झाला असल्याने नदीकाठावरील गावांतील लोकांनी सतर्कता बाळगावी असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

अधिक वाचा : नागपूरात १३ माध्यमकर्मी कोरोनाबाधित

 "