Mon, Aug 10, 2020 21:33होमपेज › Vidarbha › वर्धा शहरात तीन दिवस कडकडीत संचारबंदी

वर्धा शहरात तीन दिवस कडकडीत संचारबंदी

Last Updated: Jul 11 2020 9:08AM

संग्रहित छायाचित्रनागपुर : पुढारी वृत्तसेवा 

कोरोना रूग्णांचे वाढते आकडे पाहता वर्धा शहरातही तीन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. काल (ता.१०) रात्रीपासून ही संचारबंदी सुरू झाली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे वर्धा शहर आणि शहराला लागून असलेल्या १३ ग्रामपंचायतमध्ये शुक्रवारी (दि.१०) रात्री ८ वाजल्यापासून पुढील ३ दिवस कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी दिले आहेत. या काळात केवळ औषधी दुकाने, दवाखाने, दूध, वर्तमान पत्र वाटप, अत्यावश्यक शासकीय कार्यालय चालू राहतील.

अधिक वाचा :  विदर्भ : गडचिरोलीत ८, यवतमाळमध्ये १६ रुग्णांची भर

वर्धा शहराला लागून असलेल्या  पिपरी मेघे येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चार व्यक्ती कोरोना बाधित निघाल्या आहेत. आणखी रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता तीन दिवस, १० जुलैचे रात्री ८ वाजता पासून दिनांक १३ जुलैचे रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे. ही संचारबंदी वर्धा शहर आणि शहराला लागून असलेल्या ९ ग्रामपंचायती, सावंगी मेघे, पीपरी मेघे, उमरी मेघे, सिंदी  मेघे, बोरगाव, मसाळा, सातोडा, नालवाडी, नटाळा, या ग्रामपंचायतमध्ये संचारबंदी लागू राहील. या काळात नागरिकांनी घरी राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.